BMC Ward Committee Election : एकूण १७ पैकी ११ प्रभाग समित्यांवर भाजप आणि शिवसेनेचे वर्चस्व राहिले आहे, तर उर्वरित सहा समित्यांच्या अध्यक्षांमध्ये ‘उबाठा’चे दोन, काँग्रेसचे दोन, मनसेचे एक आणि एमआयएमचे एक उमेदवार निवडून आले आहेत.
प्रभाग समित्यांवर महायुतीचं वर्चस्व
मुंबईत १७ प्रभाग समित्या आहेत. प्रत्येक प्रभाग समितीत प्रभागातून निवडून आलेल्या नगरसेवकांचा समावेश असतो. विभाग अधिकारी हा प्रभाग समितीच्या क्षेत्राचा अधिकारी असतो. प्रभाग समिती क्षेत्रामधील सामाजिक कल्याण कार्यक्रमामध्ये व्यग्र असलेल्या प्रतिष्ठित बिगर शासकीय संस्था आणि सामाजिक संस्थांचे तीनपेक्षा कमी इतके सदस्य नगरसेवकांमार्फत नामनिर्देशित केले जातात. प्रभाग समित्यांचा कालावधी महानगरपालिकेच्या कालावधीइतकाच असतो. या समित्यांचे एक अध्यक्षही असतात. त्यासाठी समिती सदस्यांमार्फत ही निवडणूक लढवली जाते. यासाठी प्रत्येक पक्ष आपला उमेदवार अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरवतो. १७ प्रभाग समित्यांच्या अध्यक्षपदांसाठी ५, ६ आणि ९ मार्च रोजी निवडणुका पार पडल्या.
कोणाला किती मतं?
सोमवारी एन प्रभाग, एल प्रभाग, एस आणि टी प्रभाग, एम पूर्व आणि एम पश्चिम प्रभाग समिती अध्यक्षपदाच्या निवडणुका पार पडल्या. एम पूर्व प्रभाग समिती अध्यक्षपदी एमआयएमच्या खैरनुसा हुसेन यांना आठ मते मिळाली, तर शिवसेनेच्या प्रज्ञा सदाफुले यांना पाच मते मिळाली. तर, एक मत अवैध ठरले. त्यामुळे एमआयएमच्या हुसेन निवडून आल्या.
BMC Election : काँग्रेस-सपा नगरसेवकांकडून ठाकरेंचा गेम, प्रभाग समिती अध्यक्ष निवडणुकीत श्रद्धा जाधवांचा एका मताने पराभव
एम पश्चिम, एल आणि एन या प्रभागांच्या अध्यक्षपदी अनुक्रमे भाजपच्या आशा मराठे, शिवसेनेचे विजयेंद्र शिंदे आणि भाजपच्या अश्विनी मते यांची बिनविरोध निवड झाली. तर, एस आणि टी प्रभाग समितीच्या अध्यक्षपदी भाजपच्या साक्षी दळवी १० मते मिळवून विजयी झाल्या. त्यांचे प्रतिस्पर्धी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे सुरेश शिंदे यांना आठ मते मिळाली. दोन मते अवैध ठरली.
एकनाथ शिंदे हेच लाडक्या बहिणींसोबत सर्वांच्या मनातले लाडके मुख्यमंत्री; नीलम गोऱ्हेंकडून पुनरुच्चार
‘उबाठा’ची दोन मते अवैध
एस व टी प्रभाग समिती अध्यक्षपदाची निवडणूक चर्चेची ठरली. या समितीमध्ये महायुतीचे १० आणि ‘उबाठा’ सह मित्रपक्षांचे १० असे एकूण २० सदस्य आहेत. ‘उबाठा’चे सुरेश शिंदे व ‘उबाठा’च्या नगरसेविका दीपमाला बढे यांनी भाजपच्या उमेदवार साक्षी दळवी यांच्या बाजूने असलेल्या कॉलममध्ये सह्या केल्या. त्यामुळे ही दोन मते अवैध ठरली. दोन्ही अनुभवी नगरसेवकांनी या चुका केल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
Sunetra Pawar : जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी इच्छुकांची संख्या अधिक, राष्ट्रवादीने पहिल्यांदाच अर्ज मागवले, नेत्यांचे नातेवाईकही स्पर्धेत
एल व एन या दोन प्रभाग समिती अध्यक्षपदासाठी झालेल्या निवडणुकीत पीठासीन अधिकारी म्हणून महापौर रितू तावडे यांनी आणि एम पूर्व, एम पश्चिम तसेच एस आणि टी या तीन प्रभाग समिती अध्यक्षपदासाठी झालेल्या निवडणुकीत पीठासीन अधिकारी म्हणून उपमहापौर संजय घाडी यांनी कामकाज पाहिले.
