Crime News: कोल्हापुरात एका धक्कादायक घटनेमुळे खळबळ उडाली आहे. 23 वर्षीय हर्षला त्याच्या 19 वर्षीय सख्ख्या भावानेच संपवलं असून घरगुती वादादरम्यान ही घटना घडली आहे.
पुन्हा दुसरी मुलगीच झाल्यामुळे संताप
हर्ष विलास पांढरबळे (वय 23, रा. मातंग वसाहत चौथी गल्ली) असे मृत तरुणाचे नाव असून, संशयित यश विलास पांढरबळे (वय 19) ने घटनेनंतर लगेच राजारामपुरी पोलिस ठाण्यात हजर होऊन कबुली दिली. शाहू मिल समोरील आण्णाभाऊ साठे शाळेजवळील दोन मजली घरात ही घटना घडली आहे. मृत हर्ष विवाहित असून त्याला एक 2 वर्षांची मोठी आणि 15 फेब्रुवारीला जन्मलेली लहान अशा दोन मुली आहेत. हर्षचा भाऊ यश हा अविवाहित असून मातंग वसाहतीतच हर्षसोबत राहतो.
Nashik Crime : डॉ. मनीषा जेजुरकरांनी जीव दिला, मानसोपचार तज्ज्ञ नवऱ्यावर गुन्हा, डॉक्टर महिलेशी जवळीक असल्याचा आरोप
हर्ष वाढपीचे काम करत असला तरी गांजाचे व्यसन आणि मद्यप्राशनाने तो ग्रासला होता. सायंकाळनंतर व्यसनाच्या धुंदीत कुटुंबियांना त्रास देत मारहाण करून तो शिवीगाळ करत असे. नुकत्याच जन्मलेल्या दुसऱ्या मुलीच्या जन्माने नैराश्यग्रस्त झाल्याने चार-पाच दिवसांपासून त्याच्याकडून घरात वाद तीव्र झाले होते. पत्नी-आईशी भांडण करत बाळाला टेरेसवरून फेकण्याचा प्रयत्न केल्याची देखील शेजारी सांगतात. यामुळे कुटुंब या प्रकाराला वैतागले होते.
नेमकं काय घडलं?
रविवारी सायंकाळी घरातील हॉलमध्ये किरकोळ कारणावरून हर्ष आणि यश यांच्यामध्ये पुन्हा वाद सुरू झाला. दोघे एकमेकांच्या अंगावर धाऊन गेले, संतापलेल्या यशने जवळच असलेली पाण्याने भरलेली स्टेनलेस स्टीलची बाटली उचलली आणि त्या बाटलीने हर्षच्या डोक्यावर एकापाठोपाठ अनेकवेळा जोरदार वार केले. तसेच स्टीलच्या परातीनेही हर्षवर हल्ला चढविला. वर्मी इजा होऊन हर्ष रक्ताच्या थारोळ्यात खाली कोसळला. डोक्यातून रक्तस्राव होऊन काही मिनिटांतच हर्षचा मृत्यू झाला. यावेळी झालेल्या झटापटीत यशचे कपडे-बूट रक्ताने माखलेले होते. आपल्याकडून भावाचा खून झाल्याचे लक्षात येताच यश तिथून निसटला आणि राजारामपुरी पोलिस ठाण्यात तो हजर झाला.
Acid Attack: गॅरेजमध्ये काम सुरु असताना तरुणांवर अॅसिड हल्ला; मेकॅनिकसह ग्राहक जखमी, काय घडलं?
पोलिस निरीक्षक सतीश होडगर यांना कबुली मिळताच शहर उपअधीक्षक प्रिया पाटील इतर पोलीस अधिकारी आणि फॉरेन्सिक पथक घटनास्थळी दाखल झाले. रक्ताने माखलेली बाटली, परात आणि चादर जप्त करत पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. यावेळी नातेवाईकांचा आक्रोश आणि पत्नीचा हंबरडा हृदयद्रावक होता. हर्ष याची 2 वर्षांची मुलगी निरागसपणे बाबांच्या मृतदेहाकडेपाहत होती. तर संशयित यशला रात्री अटक करण्यात आली आहे.
