• Mon. Nov 25th, 2024

    दक्षिण मुंबईच्या जागेसाठी सेना भाजपची दावेदारी, मिलिंद देवरा राहुल नार्वेकरांकडून गाठीभेटी

    दक्षिण मुंबईच्या जागेसाठी सेना भाजपची दावेदारी, मिलिंद देवरा राहुल नार्वेकरांकडून गाठीभेटी

    मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. अमित शाह यांच्या दौऱ्यानं महायुतीचा जागा वाटपाचा तिढा सुटेल,असं बोललं जात आहे. महायुतीनं जागा वाटपाचा फॉर्म्युला अद्याप जाहीर केलेला नाही. दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघाचे सध्याचे खासदार अरविंद सावंत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षासोबत आहेत. उद्धव ठाकरे २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत अरविंद सावंत यांना पुन्हा संधी देणार हे निश्चित आहे. दुसरीकडे सावंत यांच्या विरोधात कोण यावर एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि भाजप यांच्यामध्ये एकमत झालेलं नाही. सध्या दोन्ही पक्षांनी या जागेवर तयारी सुरु केलीय. भाजपकडून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांचं नाव चर्चेत आहे. दुसरीकडे शिवसेनेकडून नुकतेच ज्यांना राज्यसभेवर पाठवण्यात आलं त्या मिलिंद नार्वेकरांनी देखील तयारी सुरु केली आहे.राहुल नार्वेकरांनी वरळी आणि शिवडी मतदारसंघातील विविध कार्यक्रमांना हजेरी लावली आहे. दुसरीकडे मिलिंद देवरा यांनी देखील मतदारसंघातील विविध समाजाच्या बांधवांशी भेटीगाठी सुरु केल्या आहेत. नार्वेकर आणि देवरा यांचे बॅनर्स मतदारसंघात झळकू लागले आहेत.
    एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचा लोकसभेच्या १८ जागांवर दावा,भाजपचा तो फॉर्म्युला फेटाळला, महायुतीत जागावाटपाचा तिढा
    मिलिंद देवरा यांना नुकतंच पक्षानं राज्यसभेवर पाठवलं आहे. मात्र, त्यांनी पक्षाच्या नेत्यांकडे मुंबई दक्षिण मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास इच्छुक असल्याचं कळवल्याचं म्हटलं. देवरा केंद्रातील काँग्रेसच्या काळात केंद्रीय मंत्रिमंडळात कार्यरत होते.दुसरीकडे राहुल नार्वेकर यांचा देखील लोकसभा मतदारसंघात वावर वाढला आहे. मुंबादेवी आणि भायखळा परिसरात त्यांचे कार्यक्रमक वाढले आहेत.
    ‘मावळ’साठी ठाकरे गटाकडून मोर्चेबांधणी; भाजपशी लढत, उद्धव ठाकरेंनी कंबर कसली
    दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघात विधानसभेचे ६ मतदारसंघ आहेत. यापैकी दोन मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटाचे, भाजपचे दोन, काँग्रेसचा एक आणि शिंदे गटाचा एक आमदार आहे. दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातील २०१४ आणि २०१९ च्या निवडणुकीत अरविंद सावंत यांनी मिलिंद देवरा यांचा पराभव केला होता. आता महायुतीत ही जागा कुणाला सुटणार यावर मतदारसंघाची पुढील गणितं अवलंबून आहेत.
    हिंगोली मावळवर भाजपचा दावा, महायुतीत जागावाटपावरुन संघर्ष? दक्षिण मुंबईत देवरांसह यशवंत जाधवांचं नाव चर्चेत
    दरम्यान, उद्धव ठाकरे यांच्याकडून मविआच्यावतीनं अरविंद सावंत यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *