• Mon. Nov 25th, 2024

    बार मालकाकडून कामगाराला मारहाण, अनैसर्गिक अत्याचार; जीव वाचवण्यासाठी खिडकीतून उडी अन्…

    बार मालकाकडून कामगाराला मारहाण, अनैसर्गिक अत्याचार; जीव वाचवण्यासाठी खिडकीतून उडी अन्…

    शहापूर: एका बार अँड हॉटेलमध्ये काम करणाऱ्या ३७ वर्षीय कामगाराला ताच्यामुळे दुसरा कामगार पळून गेल्याच्या संशयातून हॉटेल मालकासह एका कारागिराने लोखंडी पाईपने बेदम मारहाण करत अनैसर्गिक अत्याचार केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. ही घटना शहापूर तालुक्यातील कसारा परिसरात असलेल्या एका बार अँड हॉटेलमध्ये घडली आहे. याप्रकरणी कसारा पोलिस ठाण्यात अनैसर्गिक अत्याचाराह बेदम मारहाणीचा गुन्हा दाखल करून पोलिसांनी बार मालक आणि कारागिराला अटक केली आहे. निखील हरी पिंगळे (वय ३५) असे अटक हॉटेल मालकाचे नाव आहे. तर मुफिज अस्लम पठाण (वय ३२) असे अटकेतील कारागिराचं नाव आहे. दोन्ही आरोपीची आज जेलमध्ये रवानगी केल्याचे सांगण्यात आले.

    पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ३७ वर्षीय पीडित कामगार हा विवाहित असून तो पत्नीपासून विभक्त राहतो. शहापूर तालुक्यातील एका गावात राहून मोखवाणे फाटा येथील सारंग बारमध्ये कामगार म्हणून काम करीत होता. पीडित या बारमध्ये काम करत असताना त्याच हॉटेलमध्ये काही दिवसांपूर्वी एका कामगाराला पीडितने ५०० रुपयात मोबाईल विक्री केला होता. मात्र, मोबाईलचे पैसे न देताच त्या कामगाराने हॉटेलमधून पळ काढला होता. दुसरीकडे पीडित कामगारामुळे आपला एक कामगार पळून गेल्याचा संशय आरोपी निखील या हॉटेल मालकाला आला. याच कारणावरून २५ फेब्रुवारी रोजी बार बंद झाल्यानंतर पीडित कामगाराशी वाद घालत त्याला शिवीगाळ करून लोखंडी पाईपने बेदम मारहाण केली.

    त्यानंतर आरोपी कारागीर मुफिज आणि आरोपी बार मालकाने त्याच्या अंगावरील कपडे काढून त्याच्यावर अनैसर्गिक अत्याचार केला. या घटनेमुळे भयभीत झालेल्या पीडित कामगाराने दोन्ही आरोपींच्या तावडीतून सुटका करीत हॉटेलच्या खिडकीतून उडी मारून घटनास्थळानावरून पळ काढला. त्यानंतर शेजारी एका हॉटेलमध्ये मित्राकडे जाऊन त्याने घडलेली घटना मित्राला सांगितली. घटना सांगितल्यानंतर कसारा प्राथमिक आरोग्य केंद्रात त जाऊन २६ फेब्रुवारी रोजी उपचारासाठी दाखल केले. या घटनेची माहिती पोलिसांना मिळत पोलिसांनी सुरुवातीला पीडित कामगाराच्या जबानी वरून दोन्ही आरोपी विरोधात भादंवि कलम ३२४, ३२५ प्रमाणे सुरुवातीला गुन्हा दाखल केला.

    दरम्यान, शहापूर उपजिल्हा रुग्णालयात पुढील उपचारासाठी पीडित कामगाराला दाखल केले असता येथील डॉक्टरांनी तपासले त्यावेळी अनैसर्गिक अत्याचार झाल्याचे समोर आले. त्यानंतर पोलिसांनी वैद्यकीय अहवाल प्राप्त करून सखोल चौकशी अंती वाढीव कलम ३७७ प्रमाणे दोन्ही आरोपी विरोधात गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली. अटक आरोपीना न्यायालयात हजर केले असता ४ मार्च पर्यत पोलिसकोठडी सुनावली होती. आज (सोमवारी) त्यांची पोलिसकोठडी संपल्याने दोन्ही आरोपीना पुन्हा न्यायालयात हजर केले असता त्यांना १४ दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावल्याने त्यांची रवानगी जेलमध्ये करण्यात आल्याची माहिती या गुन्ह्याचा तपास करणारे पोलिस उपनिरीक्षक सागर जाधव यांनी दिली आहे.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *