Maharashtra Politics: राज्यातील विधानसभा निवडणुकीत महायुतीला प्रचंड मोठे यश मिळाले. भाजपसह शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला मोठा विजय मिळवता आला आहे. या विजयानंतर शिवसेनेचे नेते उदय सामंत यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे.
महाराष्ट्राच्या जनतेने महायुतीला स्पष्ट कौल दिला आहे ज्या वेळेला महाविकास आघाडीचे खासदार निवडून आले त्यावेळेला ईव्हीएम मध्ये गडबड नव्हती आणि आता आम्ही निवडून आलो त्यानंतर ईव्हीएम मध्ये गडबड झाली असा आरोप करण्यात येत आहे. मला असं वाटतं की या सगळ्या वर आता हा जनतेचा कौल असून त्यांनी यावर जास्त बोलू नये.
तुमच्या मतदारसंघात कोण विजयी झाले? महाराष्ट्रातील २८८ नवनिर्वाचित आमदारांची यादी एका क्लिकवर
त्यांचे उरलेले आमदारही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बरोबर…
शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाचे अनेक आमदार हे निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात असून मी याबाबत काही अधिक बोलणं हे उचित ठरणार नाही, असे सूचक वक्तव्य उदय सामंत यांनी केले आहे.
फक्त १० जागांवर विजय! निकालाच्या २४ तासानंतर सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया आली; या निकालातून…
कोकणच्या विकासाला प्राधान्य असून 15 पैकी 14 जागा जिंकून पुन्हा एकदा कोकण हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे माननीय बाळासाहेबांच्या विचारावर चालणारा कोकण विभाग असल्यास पुन्हा एकदा सिद्ध केला आहे. विरोधकांनी केवळ गद्दार म्हणून आरोप केले मात्र हे आरोप केवळ चालत नाहीत काम देखील करावे लागतं आणि विरोधकांची परिस्थिती पाहता गिरे तो भी टांग उपर अशी आहे.या वेळच्या निकालाचा सगळ्यात मोठा गेम असा आहे की आमचे आमदार निवडून आले त्यानंतर आता EVM मध्ये गडबड आहे असा आरोप करतात मात्र तुमचे खासदार त्यावेळेला ईव्हीएम मध्ये गडबड नव्हती आणि आता आम्ही सगळे निवडून आलो त्या वेळेला ईव्हीएम मध्ये गडबड झाली असा आरोप करता.मात्र हा त्यांचा उरलेसुरले आहेत त्याला राजकीय बळ देण्याचा हा सगळा प्रकार आहे असाही टोला उदय सामंत यांनी उद्धव ठाकरे गटाला लगावला आहे. तुमचा आता विरोधी पक्ष नेता देखील मिळू शकत नाही इतकं जनतेने नाकारले आहे. त्यामुळे आता विरोधकांनी आत्मचिंतन करावं नाहीतर उरलेसुरले आमदारही शिंदे साहेबांबरोबर येतील असाही थेट इशारा उदय सामंत यांनी दिला आहे.
भाजप मनाचा उदारपणा दाखवणार का? सत्तास्थापन झाल्यानंतर महायुतीला घ्यावा लागणार सर्वात मोठा निर्णय
शिवसेनेचे नेते उद्योग मंत्री उदय सामंत म्हणून तब्बल पाचव्यांदा आमदार झाले आहेत. तर त्यांचे जेष्ठ बंधू किरण उर्फ भैय्या सामंत हेही राजापूर लांजा विधानसभा मतदारसंघातून पहिल्यांदाच आमदार झाले आहेत. तसेच विद्यमान आमदार उदय सामंत हे राज्याच्या मावळत्या मंत्रिमंडळात उद्योग मंत्री आहेत. मात्र आता नव्याने स्थापन होणाऱ्या मंत्रिमंडळात उदय सामंत यांचे मंत्रीपद नक्की कोणत्या खात्याचा असेल याबाबतही अनेकांना उत्सुकता लागली आहे एकच नाही तर रत्नागिरी जिल्ह्यातून दुसऱ्यांदा आमदार झालेले शिवसेनेचे नेते माजी पर्यावरण मंत्री रामदास कदम यांचे सुपुत्र व विद्यमान आमदार योगेश कदम या युवा नेतृत्वाला मंत्रिमंडळ स्थान मिळेल का किंवा मिळालं तर कोणतं खाते मिळेल? या सगळ्याकडे अवघ्या कोकणच्या नजरा लागले आहेत.