• Sat. Sep 21st, 2024

हळदीच्या कार्यक्रमातील जेवणातून २०० जणांना विषबाधा, अहमदनगरच्या अकोले तालुक्यात खळबळ

हळदीच्या कार्यक्रमातील जेवणातून २०० जणांना विषबाधा, अहमदनगरच्या अकोले तालुक्यात खळबळ

अहमदनगर : जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील करवंदरा येथे हळदी कार्यक्रमासाठी गेलेल्या २०० ग्रामस्थांना विषबाधा झाली असून त्यापैकी ५९ रुग्णांना तातडीने राजूर,कोहणे,समशेरपूर,खिरविरे रुग्णालयात हलविण्यात आले आहे. यात सात छोटया बालकांचा समावेश आहे. बुधवारी सकाळी हा प्रकार समोर आला. माजी आमदार वैभव पिचड घटनेची माहिती मिळताच तातडीने घटनास्थळी पोहचले आणि भेट देऊन अति गंभीर रूग्णांना तातडीने नाशिक संगमनेर येथे पाठवले आहे. या घटनेने अकोले तालुक्यात खळबळ उडाली आहे.करवंदरा येथील सोमा दगडू भांगरे यांचा मुलगा सखाराम याचा विवाह पाडोशी येथील रामभाऊ साबळे यांच्या मुलीशी निश्चित झाला होता. नवरदेवाकडे हळदीचा कार्यक्रम मंगळवारी रात्री असल्याने दोनशे ग्रामस्थ आणि नातेवाईक जेवणासाठी आले होते. मात्र, रात्री जेवल्यानंतर सकाळी काही वऱ्हाडी पाडोशीला गेल्यावर ते काहींना रस्त्यातच त्रास उलटया जुलाब होऊ लागल्यामुळे त्यांना तातडीने राजूर रुग्णालय, कोहणे, खिरविरे रुग्णालयात हलविण्यात आले. डॉ. दिघे, डॉ.एन एस.बांगर त्यांच्यावर उपचार करत आहे. यामध्ये महिला व बालकांची संख्या अधिक असून त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार करण्यात येत आहे.
मंदिरातील भगरीचा प्रसाद खाताच भाविकांना त्रास, २०० जणांना विषबाधा, दोरीला सलाइन बांधून उपचार
या रुग्णांमध्ये कृष्णा भांगरे,सखुबाई कोंडार ,द्रौपदाबाई कोंडार ,सुलबाई कोंडार ,नीता अशोक कोंडार ,गणेश मोहधुळे,समीर भांगरे ,कोमल भांगरे, विठाबाई भांगरे,वैष्णवी दाभाडे ,मीराबाई भांगरे,सुमनबाई कोंडार, तान्हुबाई भांगरे ,देवकाबाई भांगरे,सीताराम म्हशाल,मनीषा भांगरे,सविता कडाळी ,मीराबाई भांगरे,अलका भांगरे ,अशोक सुरकुले ,सयाजी कवटे,समीर भांगरे,सोमा कोंडार असे एकूण २६रुग्ण राजूर रुग्णालयात तर कोहणे ग्रामीण रुग्णालयात १६ तर खिरविरे येथे १२ रुग्ण दाखल असून ५४ रुग्णांना दाखल करण्यात आले असून २० रुग्णांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून जिल्हा आरोग्य अधिकारी,सिव्हिल सर्जन यांना माजी आमदार वैभव पिचड यांनी संपर्क करून रुग्णाची माहिती देऊन उपचारासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.
Read Latest Maharashtra News And Marathi News

मराठ्यांपुढे दादागिरी लावली का? मंडप काढत असल्याचं कळताच मनोज जरांगे रुग्णालयातून अंतरवालीकडे निघाले

करवंदरा येथे काल रात्री हळदीचा कार्यक्रम असल्याने सोमा दगडू भांगरे यांचे घरी २०० ग्रामस्थ जेवणासाठी गेले असताना डाळ भात, भाजी, गोड असे पदार्थ खाल्ले. मात्र, त्यांना सकाळपासून उलट्या, जुलाबाचा त्रास सुरू झाला. त्यापैकी २७ लोक पडोशी येथे पोहचले त्यांनी त्रास झाल्याने त्यांनी खिरविरे,समशेरपूर येथे उपचार घेतले. कोहणे राजूर येथे ३८ रुग्ण उपचार घेत आहेत.
हिंगणवेढे-कोटमगावदरम्यान ट्रक अन् सुमो गाडीचा भीषण अपघात, तिघे ठार, तर ६ जण जखमी
गंभीर असणाऱ्या रुग्णांना तातडीने नाशिक,संगमनेर,लोणी येथे तर काही रुग्नांची खासगी रुग्णालयात सोय करण्यात आली आहे. डॉ.रामनाथ दिघे,(ग्रामीण रुग्णालय राजूर)राजूर रुग्णालयात लहान मोठे,वृद्ध,महिला असे २६ रुग्ण दाखल असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. अन्नातून विषबाधा झाली असून त्यामुळे काही रुग्ण गंभीर असून त्यांना नाशिक ,संगमनेर येथे हलविण्यात आले आहे. नाशिक येथे आमदार डॉ. किरण लहामटे यांच्या पत्नी पुष्पाताई लहामटे या रुग्णालयात रुगणांसोबत पोहोचल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed