संगमनेरमध्ये अतिशय धक्कादायक घटना समोर आली आहे. शाळेतून घरी जाणाऱ्या चिमुरडीवर अज्ञात आरोपीने ॲसिड हल्ला केला आहे. या घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
अनिकेत यादव, अहिल्यानगर : संगमनेरमध्ये अतिशय संतापजनक घटना समोर आली आहे. इयत्ता सहावीच्या विद्यार्थीनीवर अज्ञात आरोपीने थेट ॲसिड हल्ला केला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. अवघ्या ते दहा ते बरा वर्षाच्या मुलीवर अशाप्रकारे हल्ला झाल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. ही विद्यार्थिनी शाळा सुटल्यानंतर आपल्या घरी जात होती. आपल्यावर अशाप्रकारे हल्ला होईल? असं तिला कधीही वाटलं नव्हतं. पण अचानक एका नराधमाने तिच्यावर थेट ॲसिड हल्ला केला. या हल्ल्यात तिच्या चेहऱ्याला गंभीर दुखापत झाली आहे. या घटनेनंतर शाळेत शिक्षण घेणाऱ्या चिमुकली मुलीदेखील सुरक्षित नाहीत का? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे.
संगमनेर तालुक्यात पुन्हा एकदा मानवतेला काळीमा फासणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. वडगाव पान परिसरात शाळा सुटल्यानंतर घरी परतणाऱ्या अवघ्या पाचवी-सहावीतील अल्पवयीन विद्यार्थिनीवर अज्ञात व्यक्तीने ॲसिड फेकून हल्ला केला. या अमानुष प्रकारामुळे संपूर्ण परिसर हादरून गेला आहे. दुपारी सुमारे दोन वाजेच्या सुमारास ही घटना घडली. शाळेतून घरी जात असताना अचानक हल्लेखोराने मुलीवर अॅसिड फेकल्याची माहिती समोर येत आहे. हल्ल्यानंतर मुलीने आरडाओरडा केल्याने परिसरातील नागरिक तत्काळ धावून आले. त्यांनी तातडीने पोलिसांना माहिती देत मुलीला उपचारासाठी लोणी येथील खासगी रुग्णालयात दाखल केले.
अल्पवयीन मुलीवर असा अमानुष हल्ला करणाऱ्या नराधमाला तात्काळ अटक करून कठोर शिक्षा द्यावी. सदर विद्यार्थिनी गंभीर जखमी असून तिच्यावर उपचार सुरू आहेत. तिची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते. या क्रूर आणि निर्घृण हल्ल्यामुळे संगमनेर तालुक्यात भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. अल्पवयीन मुलीवर असा अमानुष हल्ला करणाऱ्या नराधमाला तात्काळ अटक करून कठोर शिक्षा द्यावी, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून होत आहे.
पोलिसांनी अज्ञात आरोपीचा शोध सुरू केला आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करण्यात येत आहे. हल्लेखोर तरुण असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. लवकरच आरोपी पोलिसांच्या ताब्यात येईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. या घटनेने पुन्हा एकदा महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असून प्रशासनासमोर मोठे आव्हान उभे ठाकले आहे.
लेखकाबद्दलचेतन पाटील“चेतन पाटील हे पत्रकार आहेत. त्यांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, मनोरंजन आणि क्रीडा अशा विविध बीटच्या बातम्या केल्याचा अनुभव आहे. चेतन पाटील यांनी दैनिक लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा विविध वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. चेतन हे जवळपास 8 वर्षांपेक्षा अधिकचा काळ माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी कल्याणच्या नामांकित बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी शिक्षण घेतलं आहे. त्यांना पदवीचं शिक्षण घेत असताना एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम करण्याचा अनुभव आहे. सध्या ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन येथे कार्यरत आहेत.
चेतन पाटील यांनी केलेल्या बातमीमुळे एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली. याशिवाय चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट पडलेला बघायला मिळाला आहे.
चेतन पाटील महाविद्यालयात शिक्षण घेत असताना त्यांच्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या कवीकट्टा सदरात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांनी नाटकातही काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य हौशी स्पर्धेत भाग घेतलाय. त्यांनी ‘जलरंग तापी’ नाट्य संस्थेसोबत काम करत असताना ‘नटसम्राट’ नाटकात बूटपॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका साकारली होती. त्यांची ही भूमिका प्रचंड भाव खाऊन गेली होती. त्यांच्या अभिनयाने प्रभावित होऊन एका प्रेक्षकाने त्यांना खांद्यावर उचलून घेत नृत्य केलं होतं.
खूप छोट्या गोष्टींमधून आनंद शोधावा, असं त्यांचं मत आहे. त्यांना पत्रकारितेसह वाचन, लेखनाची आवड आहे. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं वैयक्तिक आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.”… आणखी वाचा