• Wed. Mar 18th, 2026
    Solapur Crime : सोलापूरमधील दुहेरी हत्याकांडाचा उलगडा; प्रॉपर्टीसाठी पुतण्यांनी काका-काकीचा जीव घेतला, आरोपी अटकेत

    कुमठा नाका परिसरातील वृद्ध पती-पत्नीच्या संशयास्पद मृत्यूचा छडा लावण्यात एमआयडीसी पोलिसांना यश आले आहे. मालमत्तेच्या वादातून सख्ख्या पुतण्यांनीच काका-काकीचा उशीने तोंड दाबून खून केल्याचे तपासात निष्पन्न झाले असून, दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे.

    सोलापुरात मालमत्तेच्या वादातून वृद्ध पती-पत्नीची पुतण्यांकडून हत्या(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    इरफान शेख, सोलापूर : सोलापुरात रविवारी महादेव मंचाळ आणि रंगम्मा मंचाळ या वृद्ध पती पत्नीचा संशयास्पदरित्या राहत्या घरी मृतदेह आढळला होता. एमआयडीसी पोलिसांनी कसून तपास करत, या खुनाचा छडा लावला. रंगम्मा मंचाळ आणि महादेव मंचाळ या दोघा वृद्ध पती पत्नीला सख्ख्या दोन पुतण्यानी ठार केले असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. पोलिसांनी राहुल रामचंद्र मंचाळ (वय 26) आणि विकास रामचंद्र मंचाळ (वय 23 वर्षे)या दोघांना अटक केले आहे.पोलिसांनी राहुल मंचाळ आणि विकास मंचाळ यांना ताब्यात घेत चौकशी केली, पोलिसी खाख्या दाखवताच जागेच्या कारणावरून वृद्ध काका काकीला ठार केले असल्याची धक्कादायक कबुली पोलिसांना दिली आहे.दोघा पुतण्यानी अतिशय थंड डोक्याने वृध्द काका काकीला उशिने तोंड दाबून ठार केले, त्यानंतर अंघोळ केली आणि रवाना झाले.एमआयडीसी पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रमोद वाघमारे आणि पोलीस निरीक्षक विजय खोमणे यांनी व यांच्या टीमने या खुनाचा छडा लावला आहे.

    प्रॉपर्टीच्या वादातून वृद्ध दाम्पत्याला खल्लास केलं

    प्रॉपर्टीच्या वादातून अर्धांगवायू झालेले काका महादेव नरसप्पा मंचाळ (वय ६८) व काकू रंगम्मा महादेव मंचाळ (६२, रा. कृष्णानगर, कुमठा नाका सोलापूर) यांचा खून पुतण्यांनीच केल्याचे तपासात उघडकीस आली आहे. राहुल रामचंद्र मंचाळ (२६), विकास रामचंद्र मंचाळ (२३, रा. हैद्राबाद) असे त्या आरोपींची नावे आहेत. महादेव मंचाळ आणि रंगम्मा मंचाळ यांच्या सोबत प्रॉपर्टीच्या वादातून रामचंद्र मंचाळ आणि त्यांची दोन मुलं राहुल मंचाळ आणि विकास मंचाळ यांच्यासोबत नेहमी खटके उडत होते. कुमठा नाका परिसरात असलेल्या कृष्णा नगर येथे असलेली घर जागा पुतणे मागत होते. रंगम्मा मंचाळ आणि महादेव मंचाळ विरोध करतायत याचाच राग मनात धरून पुतण्यानी वृद्ध काका काकीला ठार केले.

    घर विकायला काढल्यानंतर वाद वाढला

    मंचाळ कुटुंब मोठा कुटुंब म्हणून ओळखला जातो. महादेव, रामचंद्र, आणि निळकंठ असे तिघे भाऊ. महादेव मंचाळ बीएसएनएल मध्ये शासकीय नोकरीस होते,तर रामचंद्र मंचाळ वन विभागात शासकीय नोकरीला होते.निळकंठ मंचाळ यांना मात्र नोकरी लागली नाही म्हणून नरसप्पा मंचाळ यांनी कृष्णा नगर(सोलापूर ) येथील प्लॉट निळकंठ यांच्या नावावर केली होती. महादेव मंचाळ यांना अपत्य नसल्याने निळकंठ मंचाळ यांनी दोन्ही प्लॉट महादेव व रंगम्मा यांच्या ताब्यात दिले होते. रामचंद्र मंचाळ यांची दोन्ही पोरं घर जागा मागत होते. घर जागेवरून मंचाळ कुटुंबियांत वाद वाढत चालले होते .

    Maharashtra TimesPune Crime : शिरूरमध्ये मुलाकडून वृद्ध आईला अमानुष मारहाण, जमिनीच्या वादात माणुसकी हरली

    थंड डोक्याने संपविले; अंघोळ केली अन् रवाना झाले

    ‘बीएसएनएल’मधून निवृत्त झालेले महादेव मंचाळ व त्यांची पत्नी रंगम्मा मंचाळ या दोघांचा पुतण्यानी खून केला आहे.राहुल मंचाळ आणि विकास मंचाळ या दोन पुतण्यानी अतिशय थंड डोक्याने शनिवारी मध्यरात्री काका काकीच्या रूम मध्ये शिरले . उशी सदृश मऊ कापडाने दोघांचे तोंड दाबून त्याचा खून केला.त्याच घरात अंघोळ केली.आणि रात्रीच निघून गेले.मयत महादेव यांचे बंधू निळकंठ मंचाळ यांनी शनिवारी फोन केला असता, फोन उचलला नव्हता.रविवारी सकाळी फोन बंद दाखवला.निळकंठ मंचाळ यांनी ताबडतोब मित्राला कृष्णा नगर येथील घरी पाठविलं आणि हा दुहेरी हत्याकांड उघडकीस आला.

    काका काकीची हत्या करून दोघे पसार झाले होते

    एम आय डी सी पोलिसांनी दुहेरी हत्याकांडाचा तपास केला. कौटुंबिक माहिती घेतली असता, भावकित वाद असल्याचे समोर आले. संशयित आरोपीचे रामचंद्र मंचाळ हे बालाजी (आंध्रप्रदेश)येथे गेले असल्याची माहिती मिळाली. रामचंद्र मंचाळ यांच्या दोन्ही मुलांना ताब्यात घेण्यासाठी पोलिसांनी रामचंद्र मंचाळ यांना ताब्यात घेतले. मुलांना फोन करून सोलापुरात बोलावले, राहुल मंचाळ आणि विकास मंचाळ सोलापुरात दाखल होताच पोलिसांनी ताबडतोब त्यांना ताब्यात घेतले.

    Maharashtra TimesTadoba Pillars History : ‘ताडोबातील खांब इंग्रजकालीन नाहीत’; शिवकालीन असल्याचा इतिहास संशोधक प्रा. सुरेश चोपणे यांचा दावा

    सोमवारी दिवसभर सखोल तपास करत, रात्री उशिरा खुनाचा गुन्हा दाखल केला आणि मंगळवारी कोर्टात हजर केले. दुहेरी खुनाचा तपास करण्यात पोलिस निरीक्षक प्रमोद वाघमारे, पोलिस निरीक्षक खोमणे आणि त्यांच्या टीमने विशेष परिश्रम घेतले.

    सुनिल लाटे

    लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे, हे एक पत्रकार आहेत. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ येथून बी.ए व एम.ए. पत्रकारितेचं पदव्यूत्तर शिक्षण पूर्ण केलं आहे. कॉलेज जीवनातच ‘दैनिक दिव्य मराठी’मध्ये पत्रकारितेचं प्रत्यक्ष प्रशिक्षण घेतलं आहे. दोन वर्षे ‘लोकसत्ता डॉट कॉम’साठी ‘फोटोगॅलरी व वेबस्टोरी’ या विभागात काम केलं आहे. ते ६ ऑक्टोबर २०२५ पासून ‘महाराष्ट्र टाईम्स’ ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. राजकारण, मनोरंजन, क्रीडा या विषयांच्या लिखाणात आवड आहे. याशिवाय काव्य लेखन, गीत लेखन आणि सादरीकरणातही स्वारस्य आहे. फोटोग्राफी, फोटो, व्हिडिओ संपादनातही खास रस आहे… आणखी वाचा