• Wed. Mar 18th, 2026
    एका यकृतातून दोन जीवांना नवसंजीवनी; पुण्यात अवयवदानाची  कहाणी

    Produced by: कोमल आचरेकर|महाराष्ट्र टाइम्स.कॉम

    पुण्यात एक आशादायी आणि मनाला स्पर्श करणारी शस्त्रक्रिया यशस्वी झाली आहे. एका मेंदूमृत व्यक्तीच्या अवयवदानामुळे दोन नव्हे तर तब्बल चार जणांना जीवनदान मिळालं आहे.विशेष म्हणजे एका यकृताचे दोन भाग करून दोन वेगवेगळ्या रुग्णांवर यशस्वी प्रत्यारोपण करण्यात डॉक्टरांना यश आलं.ही अत्यंत गुंतागुंतीची स्प्लिट लिव्हर ट्रान्सप्लांट शस्त्रक्रिया पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात पार पडली.यात ६ वर्षांच्या चिमुकलीपासून ते ५८ वर्षांच्या रुग्णापर्यंत दोघांना नवजीवन मिळालं आहे.सध्या दोघांचीही प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली.यकृतासोबतच मेंदूमृत दात्याची दोन्ही मूत्रपिंडं आणि डोळ्यांचे कॉर्नियाही यशस्वीपणे दान करण्यात आलेत्यामुळे एकाच निर्णयाने चार जणांच्या आयुष्यात आशेचा किरण निर्माण झाला आहे.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed