• Sat. Sep 21st, 2024

नाना पटोलेंविरोधात पुन्हा असंतोष, १२ निष्ठावंतांची गुप्त बैठक, असंतुष्ट गट दिल्लीला रवाना

नाना पटोलेंविरोधात पुन्हा असंतोष, १२ निष्ठावंतांची गुप्त बैठक, असंतुष्ट गट दिल्लीला रवाना

नागपूर : लोकसभा निवडणुकीची घोषणा येत्या पंधरवड्यात होण्याची शक्यता असताना काँग्रेसमधील खदखद उफाळण्याचे संकेत मिळू लागले आहेत. महत्त्वाचे पद, जबाबदारी वा कार्यक्रमांमधून डावलले जात असलेल्या असंतुष्टांनी सिव्हिल लाइन्स परिसरात बुधवारी गुप्त बैठक घेऊन असंतोषाला वाट मोकळी करून दिली. या गुप्त बैठकीस सुमारे एक डझन पदाधिकारी उपस्थित होते. राहुल गांधी, सोनिया गांधी यांच्याकडे नानांविरुद्ध कैफियत मांडली जाण्याची शक्यता आहे.

काय आहेत कारणं?

राज्यसभा निवडणुकीत हिमाचल प्रदेशमध्ये पक्षाला बसलेला धक्का, अशोक चव्हाण यांच्या पक्षत्यागाच्या पार्श्वभूमीवर नव्याने चर्चा करण्यात आली. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या कार्यपद्धतीवरून पदाधिकाऱ्यांनी असंतोष व्यक्त केला.
शिरुरमध्ये जिंकणार जरुर, आढळरावांना विश्वास; पण शिंदेंची साथ सोडून नव्या पक्षप्रवेशाची तयारी?

डावलल्याची भावना

प्रदेश काँग्रेसकडून सातत्याने नियुक्त्या केल्या जात आहेत. मात्र, जुन्या निष्ठावान कार्यकर्त्यांवर अन्याय केला जात आहे. ३-४ दशकांपासून पक्षासाठी झटणाऱ्यांची दखल घेतली जात नाही. मानसन्मान तर दूर साधी विचारपूस केली जात नाही. संसदीय मंडळ, विधानसभा मतदारसंघातील काही नावांवरून नाराजीचा सूर व्यक्त करण्यात आला. जुने, निष्ठावान पदाधिकारी व कार्यकर्त्यांना डावलून पक्षात नव्याने आलेल्यांना महत्त्वाची पदे, जबाबदारी देणे, संघटनेच्या प्रशिक्षण शिबिरात सचिवांना डावलने, असा असंतोष पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.

अशोक चव्हाणांनी आयुष्यभर सोबत राहून काँगेस एका खासदारावर आणून ठेवली; नाना पटोलेंचा घणाघात

Read Latest Maharashtra News Updates And Marathi News

भाजपसह अन्य पक्ष संघटन बळकट करण्यासाठी सरसावले असताना काँग्रेसमध्ये मात्र, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याविरोधात परत मोर्चेबांधणी सुरू झाली. दरम्यान, असंतुष्टांचा एक गट बुधवारी सायंकाळी दिल्लीला रवाना झाल्याची माहिती आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed