• Sat. Sep 21st, 2024

बीएमसीतील ‘त्या’ अधिकाऱ्यांची बदली अटळ, निवडणूक आयोगानं राज्याची विनंती फेटाळली

बीएमसीतील ‘त्या’ अधिकाऱ्यांची बदली अटळ, निवडणूक आयोगानं राज्याची विनंती फेटाळली

मुंबई : भारतीय निवडणूक आयोगाच्या एका निर्णयानं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वातील राज्य सरकारला मोठा धक्का बसला आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगानं ज्या अधिकाऱ्यांनी नियुक्तीच्या ठिकाणी तीन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला आहे त्यांची बदली करण्याचे आदेश दिले आहेत. राज्य सरकारनं मुंबई महापालिका आयुक्त आणि अतिरिक्त महापालिका आयुक्त यांना त्यातून वगळण्याची विनंती निवडणूक आयोगाला केली होती. मात्र, निवडणूक आयोगानं राज्याचा प्रस्ताव फेटाळला आहे. यामुळं मुंबई महापालिका आयुक्त इकबाल चहल आणि अतिरिक्त महापालिका आयुक्त अश्विनी भिडे आणि पी. वेलारसू यांची बदली करणं राज्य सरकारला अनिवार्य होऊन बसलं आहे.भारतीय निवडणूक आयोगानं राज्य सरकारच्या विनंती नामंजूर केल्यानं आता एकनाथ शिंदे यांच्या सरकारपुढं अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्याशिवाय दुसरा पर्याय राहिलेला नाही. मुंबई महापालिका आयुक्त इकबाल चहल यांची मुंबई महापालिकेत ३१ मे २०२४ रोजी चार वर्ष पूर्ण होतील. दुसरीकडे मुंबई महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे आणि पी. वेलारसू यांची देखील तीन वर्ष पूर्ण झाली आहेत.
राज ठाकरेंची एक मागणी मान्य होताच सुपुत्राचीही नवी विनंती, अमित ठाकरेंचं एकनाथ शिंदेंना पत्र
राज्य सरकारनं २६ फेब्रुवारी रोजी निवडणूक आयोगाला एक पत्र लिहून अधिकाऱ्यांच्या बदल्यासंदर्भातील निकषातून मुंबई महापालिका आणि अतिरिक्त महापालिका आयुक्त यांना वगळण्याची विनंती केली होती. राज्य सरकारनं निवडणूक आयोगाकडे विनंती करताना हे अधिकारी थेट निवडणुकीच्या कामाशी संबंधित नाहीत. ते अधिकारी पायाभूत सोयी सुविधांच्या प्रकल्पांशी संबंधित असून ते मान्सूनच्या पूर्वतयारीच्या कामांशी निगडित असल्याचं म्हटलं होतं.
Read Latest Maharashtra News And Marathi News
विद्यार्थ्यांची परीक्षा की निवडणूका? निवडणूक आयोगाच्या कार्यालयांमुळे शैक्षणिक संस्थांसमोर नवी अडचण
भारतीय निवडणूक आयोगाचे सचिव यांनी राज्य निवडणूक आयुक्त श्रीकांत देशपांडे यांच्या २६ फेब्रुवारीच्या पत्राला उत्तर देताना आपण पाठवलेलं पत्र निवडणूक आयोगाच्या डिसेंबर २१ सूचनांचं पालन करत नसल्याचं म्हटलं. निवडणूक आयोगानं डिसेंबर २१ च्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणं मुख्य निवडणूक अधिकारी, मुख्य सचिव आणि समकक्ष अधिकाऱ्यांनी तीन वर्ष पूर्ण केली असतील त्यांची ३१ जानेवारीपूर्वी बदली करण्याचे आदेश दिले होते. निवडणूक आयोगाच्या सूचनांनुसार महापालिकामंध्ये नियुक्त करण्यात आलेले अधिकारी, विकासाच्या कामांसाठी नियुक्त करण्यात आलेल्या अधिकाऱ्यांचा देखील त्यामध्ये समावेश होतो. राज्य सरकारनं महापालिका आयुक्त आणि अतिरिक्त महापालिका आयुक्तांना त्यातून सूट मिळावी यासाठी एक पत्र लिहिलं होतं. मात्र, ते आयोगानं फेटाळलं आहे. त्यामुळं इकबाल चहल, अश्विनी भिडे आणि पी. वेलारसू यांची बदली करणं राज्य सरकारला क्रमप्राप्त झालं आहे.
लोकसभा निवडणुकीच्या तारखांबाबत शेअर होणाऱ्या मेसेजचं सत्य समोर, केंद्रीय निवडणूक आयोगानंच खरं काय ते सांगितलं
दरम्यान, इकबाल चहल हे १९८९ च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. अश्विनी भिडे या १९९५ च्या बॅचच्या तर पी. वेलारसू हे २००२ च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed