अहिल्यानगरचे माजी महापौर अभिषेक कळमकर यांना कोर्टाने मोठा धक्का दिला आहे. अत्याचाराच्या आरोपाखाली दाखल गुन्ह्यात जिल्हा न्यायालयाने अटकपूर्व जामीन फेटाळला आहे.
शिरूरमधील हॉटेलमध्ये पुन्हा जबरदस्तीचा आरोप
फिर्यादीत पुढे नमूद केल्याप्रमाणे, त्यानंतरही आरोपीने वेळोवेळी व्हिडिओ कॉल करून अश्लील हावभाव करत पीडितेला लज्जास्पद वर्तन करण्यास भाग पाडल्याचा आरोप आहे. तसेच १८ फेब्रुवारी २०२६ रोजी शिरूर येथील एका हॉटेलमध्ये बोलावून पुन्हा जबरदस्ती केल्याचाही आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक १३२/२०२६ अंतर्गत भारतीय न्याय संहिता कलम ६४ (१), ६४ (२), ६९, ३५१ (२) तसेच माहिती तंत्रज्ञान कायदा कलम ६६ (ई) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सरकारी पक्षाचा युक्तिवाद
सरकारी पक्षाच्या वतीने विशेष सरकारी वकील मनीषा केळगंद्रे-शिंदे यांनी जोरदार युक्तिवाद करत आरोपी हा प्रभावशाली राजकीय व्यक्ती असल्याने पीडितेवर दबाव आणण्याची शक्यता असल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. तसेच गुन्ह्यात वापरलेली फॉर्च्युनर गाडी आणि आरोपीचा मोबाईल जप्त करून इलेक्ट्रॉनिक पुरावे गोळा करणे अत्यावश्यक असल्याचेही त्यांनी सांगितले.
Chhatrapati Sambhajinagar News : माफीनाम्यानंतरही तणाव, कीर्तनकार निवृत्ती महाराज वाडेकरांना जमावाकडून मारहाण
तपासासाठी कोठडी आवश्यक
दोन्ही बाजूंचे युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने आरोपांचे गंभीर स्वरूप लक्षात घेत तपासासाठी आरोपीची कोठडी आवश्यक असल्याचे नमूद करत अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला.
दरम्यान, या सुनावणीदरम्यान तोफखाना पोलीस ठाण्याचे पी.आय. भांबळ हे संबंधित कागदपत्रांसह न्यायालयात उपस्थित होते. तसेच मूळ फिर्यादीतर्फे अॅड. विजय गुंदेचा यांनीही सरकारी पक्षास सहकार्य केले.
