कोल्हापूर: आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरातून महाविकास आघाडीकडून श्रीमंत शाहू महाराज छत्रपती आणि संभाजीराजे छत्रपती चर्चेत होते. मात्र, आता महाविकास आघाडीकडून श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांचे नाव जवळपास निश्चित झाले झाले आहे. सध्या या जागेवर काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गट दोघांनीही दावा केला आहे. मात्र, या संदर्भात आज महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये बैठक पार पडत असून या बैठकीत ही जागा कोणाला द्यायची हे निश्चित होणार असून सोबतच शाहू महाराज हे कोणत्या चिन्हावरून लढतील हे निश्चित होणार आहे. यामुळे संभाजीराजे छत्रपती यांचा पत्ता कट होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अशातच संभाजीराजे छत्रपती यांनी आपल्या वडिलांसोबतचा फोटो इन्स्टाग्राम या सोशल मीडियावर प्लॅटफॉर्मवर टाकत दोघांमधील प्रेम दाखवण्याचा प्रयत्न केला आहे.पश्चिम महाराष्ट्रातील महत्त्वाच्या लोकसभा मतदासंघांपैकी एक असलेल्या कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीकडून लढण्यासाठी अनेकजण इच्छुक आहेत. यामध्ये गोकुळचे संचालक चेतन नरके, स्वराज्य प्रमुख संभाजीराजे छत्रपती आणि शाहू महाराज छत्रपती यांचे नाव प्रामुख्याने चर्चेत आहेत. संभाजी राजे छत्रपती यांनी गेल्या काही दिवसांपूर्वी काँग्रेस कडून कोल्हापूर लोकसभा निवडणूक लढवण्याची इच्छा दर्शवली होती. तसेच काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांसोबत चर्चा सुरू असल्याचे म्हटले होते. मात्र महाविकास आघाडी पुरस्कृत उमेदवार म्हणून स्वराज्यमधून आपल्याला उमेदवारी मिळावी अशी इच्छा संभाजीराजे यांची होती. यानंतर संभाजीराजे यांच्या नावाला शिवसेना ठाकरे गटाकडून विरोध दर्शवत शाहू महाराजांचे नाव समोर करण्यात आले. यानंतर संभाजीराजे छत्रपती यांनी मतदार संघातील दौरे रद्द करत सार्वजनिक कार्यक्रमातून ते आठवडाभर अलिप्त राहिले.
संभाजीराजे यांनी वाढदिवसाच्या निमित्ताने मोठं शक्तीप्रदर्शन केले. मात्र, त्यांनी लोकसभेसंदर्भात बोलणं टाळलं. गेल्या आठवड्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी देखील कोल्हापूर दौऱ्यावर आले असता शाहू महाराज छत्रपती यांची भेट घेतली. तसेच काँग्रेसने देखील शाहू महाराज यांना उमेदवारी संदर्भात सकारात्मकता दर्शविल्याने महाविकास आघाडीमधून संभाजीराजे छत्रपतीचे नाव कट करत महाविकास आघाडी कडून मुलाला उमेदवारी न देता वडिलांना उमेदवारी देण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहेत. अशातच आज महाविकास आघाडीचे बैठक पार पडत असून यामध्ये कोल्हापूरच्या जागे संदर्भातील तिढा सुटण्याची चिन्ह निर्माण आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर संभाजी राजे छत्रपती व त्यांच्या पत्नी संयोगिताराजे छत्रपती यांनी इन्स्टाग्राम या सोशल मीडियावर शाहू महाराज छत्रपती यांच्यासोबत ची स्टोरी पोस्ट करत घराण्यातील प्रेम दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. यामुळे आता अनेक चर्चांना उधाण येत आहे.
Read Latest Maharashtra News And Marathi News
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरातून महाविकास आघाडी श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांचे नाव जवळपास निश्चित झाले आहे. दोन दिवसांपूर्वी शाहू महाराज छत्रपती यांनी देखील या संदर्भात सूचक वक्तव्य करत महाविकास आघाडीच जागा वाटप झाले नाही. मात्र जागा वाटपानंतर महाविकास आघाडीकडून आपल्याला निवडणूक लढवण्यासाठी ऑफर येईल म्हटले होते. तसेच त्या अनुषंगाने आपली वाटचाल सुरू असल्याचेही त्यांनी म्हटले होते.
आज महाविकास आघाडीचे जागा वाटप संदर्भात बैठक पार पडत आहे. या बैठकीत कोल्हापूरच्या जागेचा तिढा सुटणार असून ही जागा कोणाला जाईल हे स्पष्ट होणार आहे. मात्र पक्ष कोणताही असो मात्र उमेदवार शाहू महाराज छत्रपती असायला हवे या वर सर्व पक्षांचे एकमत झाले आहे. यामुळे संभाजी राजे छत्रपती यांचा महाविकास आघाडी कडून कोल्हापूर लोकसभा निवडणूक लढवण्याचं स्वप्न अपूर्णच राहण्याची शक्यता निर्माण झाली असून या आजच्या बैठकीकडे कोल्हापूर व हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील इच्छुकांचे लक्ष लागून राहिले आहे.