• Mon. Nov 25th, 2024

    अडचणीच्या काळात अजित पवारांना भक्कम साथ; शिलेदारांच्या मतदारसंघांवर दादांकडून कोटींची बरसात

    अडचणीच्या काळात अजित पवारांना भक्कम साथ; शिलेदारांच्या मतदारसंघांवर दादांकडून कोटींची बरसात

    अहमदनगर : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर सुरवातीपासूनच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत ठाम राहिलेल्या आमदारांना अजितदादांनी निधीरूपी मदत करायला सुरवात केली आहे. आम्ही विकासासाठी अजितदादांसोबत गेलो, असे हे आमदार सांगत असताना प्रत्यक्षातही त्यांच्या मतदारसंघात विकास कामे व्हावीत, याकडे आता पवार यांनी लक्ष घातले आहे. नगरचे राष्ट्रवादीचे काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप सुरवातीपासूनच अजितदादांसोबत होते. त्यांनाही मतदारसंघासाठी सुमारे दीडशे कोटींचा निधी मिळाला आहे. नगर शहरातील खराब रस्ते हा नेहमीच टिकेचा विषय असतो, त्याच रस्त्यांच्या कामासाठी हा निधी मिळाला असल्याने आगामी निवडणुकीपर्यंत रस्त्यांची कामे झाल्यास त्याचा फायदा होऊ शकतो.
    राज्य सरकारच्या नगरविकास खात्याने नगर शहरातील डीपी रस्त्याच्या प्रकल्पाच्या फेज १ ला मान्यता दिली असून पहिल्या टप्प्यातील १५० कोटींच्या कामांना मंजुरी दिली आहे. येत्या आठ दिवसांत या कामांची निविदा प्रक्रिया सुरु होणार आहे, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांनी दिली. त्यांनी सांगितले की, ‘महाराष्ट्र सुवर्णज्योत नगरोत्थान योजनेतून नगर महापालिकेला प्रथमच डीपी रस्त्यांच्या कामासाठी इतका मोठा निधी मिळाला आहे. यासाठीचा शासन निर्णय उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सुपूर्द केला आहे. नगर शहरातील रस्त्यांच्या प्रश्नांबाबत सतत ओरड होते. परंतु, प्रश्न सोडवण्यासाठी चिकाटी आणि पाठपुरावा हवा असतो. मनपाच्या तिजोरीत कायम खडखडाट असतो. त्यामुळे डीपी रस्त्यांची कामे करायची तर सरकारच्या निधीशिवाय पर्याय नाही. तो मिळवण्यासाठी प्रस्ताव तयार करण्यापासून शासन दरबारी प्रस्ताव मंजूरीसाठी प्रयत्न केल्याने हे शक्य झाले.

    Devendra Fadnavis : सत्ताधारी असो वा विरोधक, कुणाची आई-बहीण काढली, तर तुमच्या बाजूने उभा राहीन, फडणवीसांची ग्वाही
    आमदार जगताप यांच्या निर्देशानुसार महापालिका हद्दीतील डीपी रस्त्यांसाठी महापालिकेने प्रस्ताव पाठवला होता. या प्रस्तावाच्या अनुषंगाने आमदार जगताप यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा केला. आमदार जगताप यांनी राष्ट्रवादी पक्षात नेहमीच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी जवळीक कायम ठेवली आहे. मधल्या काळात झालेल्या पक्षांतर्गत राजकारणावेळीही त्यांनी अजितदादांबरोबरच राहणे महत्वाचे मानले. यात राजकारणापेक्षा शहर विकासाचे दीर्घकालीन उद्दिष्ट होते. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही आपले विश्वासू असलेल्या जगताप यांना विकासासाठी सहकार्य करीत नगर मनपा हद्दीतील डीपी रस्त्यांच्या मंजूरीसाठी विशेष प्रयत्न केले. त्यातून ही मंजुरी मिळाली. नगरच्या डीपी रस्ता प्रकल्पाच्या फेज १ ला मान्यता व रस्त्यांच्या विकास कामांसाठी १५० कोटींच्या शासन निर्णयाचे पत्र उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते आमदार जगताप यांना देण्यात आले. यावेळी सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील, आमदार अतुल बेनके उपस्थित होते.

    अजित पवारांना थांबवलं, वडेट्टीवार आशा सेविका आणि अंगणवाडी सेविकांच्या प्रश्नावरून आक्रमक

    जगताप म्हणाले, यापूर्वी नगर शहरातील कोठी रोड, बालिकाश्रम रोड, टिळक रोड, स्वस्तिकचौक ते आनंदऋषीजी महाराज समाधीस्थळ रस्ता, छ. शिवाजी महाराज चौक ते शहराचे ग्रामदैवत विशाल गणपती मंदिर मिरवणूक मार्ग रस्ता, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग, केडगाव देवी रस्ता, केडगाव लिंक रोड, पुना महामार्ग ते कल्याण महामार्गापर्यंत, केडगाव अर्चना हॉटेल ते नेप्ती बाजार समिती रस्ता, महेश टॉकीज रस्ता, तारकपूर ते राधाबाई काळे महिला कॉलेज, सराफ बाजार रस्त्यांची कामे पूर्ण झाली असून शहरात टप्य्याटप्प्याने डीपी रस्त्याची कामे मार्गी लागणार आहेत.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed