Mumbai Local Mega Block 8 March 2026: पश्चिम रेल्वेवर माहीम ते सांताक्रुझदरम्यान शनिवारी मध्यरात्रीनंतर ब्लॉक घेण्यात येणार आहे. यामुळे रविवारी दिवसा कोणताही ब्लॉक असणार नाही.
मध्य रेल्वे (मुख्य मार्ग)
स्थानक : माटुंगा ते मुलुंड
मार्ग : अप आणि डाऊन जलद
वेळ : सकाळी ११.२० ते दुपारी ३.४५
परिणाम : ब्लॉकवेळेत अप आणि डाऊन जलद मार्गावरील लोकल अप आणि डाऊन धीम्या मार्गावर वळवण्यात येणार आहेत. यामुळे काही लोकल फेऱ्या रद्द राहणार असून, काही २० मिनिटे विलंबाने धावणार आहेत.
Chandrakant Patil : ‘महाविद्यालयांमध्ये अतिरिक्त शुल्कांवर नियंत्रण आणणार’, मंत्री चंद्रकांत पाटील यांची घोषणा
हार्बर रेल्वे
स्थानक : कुर्ला ते वाशी
मार्ग : अप आणि डाऊन
वेळ : सकाळी ११.१० ते दुपारी ४.१०
परिणाम : सीएसएमटी ते वाशी/बेलापूर/पनवेलदरम्यान अप आणि डाऊन लोकल फेऱ्या रद्द राहणार आहेत. सीएसएमटी ते कुर्ला आणि पनवेल ते वाशीदरम्यान विशेष लोकल फेऱ्या चालवण्यात येणार आहेत. ब्लॉकवेळेत ठाणे ते वाशी/नेरूळदरम्यान आणि उरण मार्गिकेवरील लोकल वेळापत्रकानुसार धावणार आहेत.
Uddhav Thackeray : ‘विकासाचं मृगजळ दाखवणारा, कर्ज काढून फटाके वाजवणारा अर्थसंकल्प’, उद्धव ठाकरेंची अर्थसंकल्पावर टीका
पश्चिम रेल्वे
स्थानक : माहीम ते सांताक्रुझ
मार्ग : अप आणि डाऊन धीमा
वेळ : आज मध्यरात्री १ ते पहाटे ४.३०
परिणाम : ब्लॉकवेळेत अप आणि डाऊन धीम्या मार्गावरील लोकल अप आणि डाऊन जलद मार्गावर वळवण्यात येणार आहेत. फलाट उपलब्ध नसल्याने महालक्ष्मी, प्रभादेवी आणि माटुंगा रोडवर लोकल थांबणार नाहीत. फलाटांची लांबी अपुरी असल्याने लोअर परळ, माहीम आणि खार रोडवर लोकल दोन वेळा थांबवण्यात येणार आहेत.
२७ तारखेपर्यंत अजितदादांची अर्थसंकल्पाची तयारी, सुनेत्रा पवारांनी पत्रकार परिषदेत सांगितलं
पत्रीपुलासाठी गर्डरउभारणी
मुंबई : कल्याण ते ठाकुर्लीदरम्यान तिसऱ्या पत्रीपुलाच्या निर्मितीचे काम सुरू आहे. त्यासाठी ६ ते ९ मार्चदरम्यान होणाऱ्या गर्डरउभारणीमुळे मध्य रेल्वेने ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक घोषित केला आहे. या कालावधीत काही मेल-एक्स्प्रेसच्या मार्गात बदल करण्यात येणार आहे.
७-८ मार्च
स्थानक : कल्याण ते डोंबिवली
मार्ग : अप-डाऊन जलद आणि धीमी, पाचवी-सहावी मार्गिका
वेळ : शनिवारी मध्यरात्री १.४५ ते पहाटे ४.१५
परिणाम : ब्लॉकवेळेत कल्याण ते डोंबिवलीदरम्यान धीम्या-जलद अप आणि डाऊन लोकल फेऱ्या रद्द राहणार आहेत. सीएसएमटीतून कर्जतसाठी मध्यरात्रीनंतर १२.०८ला सुटणारी लोकल ठाण्यापर्यंतच धावणार आहे. कर्जतवरून सुटणारी मध्यरात्री २.३०ची सीएसएमटी लोकल ठाणे स्थानकातून पहाटे ४ वाजता सुरू होणार आहे.
कल्याण स्थानकातून शेवटची लोकल : सीएसएमटी-कसारा (मध्यरात्री १.३७)
कल्याण स्थानकातून पहिली लोकल : अंबरनाथ-सीएसएमटी (पहाटे ४.२१)
