Lipi•
Woman Found Dead: पुण्यात दिवेघाटाच्या पायथ्याशी एका महिलेची बॉडी आढळ्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी या प्रकरणात 29 वर्षीय प्रकाश मानेला अटक केली आहे.
नेमकं काय घडलं?
दिवेघाटाच्या पायथ्याशी 3 मार्च रोजी एका महिलेचं अर्धनग्न अवस्थेत मृतदेह सापडलं. या घटनेची बातमी कळताच फुरसुंगी पोलीस आणि गुन्हे शाखा लगेच घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी तपासाला सुरुवात करून अवघ्या काही दिवसांतच संपूर्ण घटनेचं गुढ उकललं. तपासात आरोपी प्रकाश बिभीषण माने (वय 29) याने या महिलेची हत्या केल्याचं समोर आलं असून त्याला फुरसुंगी पोलिसांनी सध्या ताब्यात घेतले आहे.
Ratnagiri Crime : ड्रायव्हर सीट मागे करुन झोपलेला, पण तोंडातून फेस दिसताच लोकांनी काच फोडली; कोकणात बंद कारमध्ये तरुणाची बॉडी सापडली
आरोपी खाजगी कंपनीत सुपरवायझरचे काम करतो. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासून पोलिसांना प्रकाश गेल्या काही दिवसांपासून महिलेवर नजर ठेवून होता ते दिसून आले. या फुटेजमुळेच गुन्ह्याचा उलगडा झाला. मृत महिला दिवेघाटाच्या पायथ्याशी झोपत असते. त्याच परिसरात तो नेहमी नजर ठेवून होता. घटनेच्या दिवशी आरोपीने महिलेशी लैंगिग संबंध ठेवण्याचा प्रयत्न केला. पण महिलेने नकार दिला. त्यामुळे रागाच्या भरात आरोपीने महिलेची अमानुषपणे हत्या केली.
रात्री 11 वाजता धक्कादायक घटना
ही घटना 3 मार्च रोजी रात्री 11 वाजेच्या सुमारस घडली. महिलेने लैंगिक संबंधाला नकार देताच आरोपीने तिच्यावर हल्ला केला. पण महिला विरोध करत आरडाओरडा करायला लागल्याने संतापलेल्या आरोपीने नागरिकांना खबर लागू नये म्हणून डोक्यात दगड घालून तिचा गळा आवळला आणि महिलेचा जीव घेतला. थरारक तपशील ऐकून परिसरातील रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. मृत महिलेची ओळख अद्याप पटलेली नाही; महिलेचे वय अंदाजे 30-40 वर्षे आहे.
सत्तेत असणारे FIR करण्यासाठी भूमिका घेत नाहीत, रोहित पवारांनी नाराजी बोलून दाखवली
ही कारवाई गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली युनिट सहा चे पोलीस निरीक्षक सुदर्शन गायकवाड आणि त्यांचे पथक करत होते. चौकशीत आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली, पण अनेक रहस्य अजून उघडलेले नाही. पोलिसांकडून सध्या मृतकाची ओळख पटवणे, आरोपीविरुद्ध पुढील कारवाई करण्याची तयारी सुरू आहे.