• Wed. Sep 23rd, 2026
राज्यातील ताज्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज वाचा एका क्लिकवर


Live News in Marathi: राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचे आश्वासन देणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी पात्र शेतकऱ्यांसाठी दोन लाख रुपयांपर्यंतच्या कर्जमाफीची घोषणा अर्थसंकल्पात करत सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. त्याचवेळी लाडकी बहीण योजनेसाठी पुरेसा निधी दिला जाईल, असे सांगताना लाडक्या बहिणींना वाढीव पैसे देण्याच्या आश्वासनावर मात्र मुख्यमंत्र्यांनी मौन बाळगले. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पीय भाषणात ‘विकसित महाराष्ट्र-२०४७’चे स्वप्न साकारण्यासाठी सरकार मोठी पावले उचलत असल्याचे नमूद केले. राज्याची अर्थव्यवस्था २०४७पर्यंत ५ लाख कोटी डॉलरपर्यंत नेण्याचे मुख्य उद्दिष्ट ठेवण्यात आले असून, त्यासाठी ‘व्हिजन डॉक्युमेंट’ जाहीर करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed