• Sat. Sep 21st, 2024
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचा लोकसभेच्या १८ जागांवर दावा,भाजपचा तो फॉर्म्युला फेटाळला

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वातील शिवसेना लोकसभेच्या १८ जागा लढवण्यावर ठाम असल्याची माहिती आहे. एकनाथ शिंदे आणि खासदारांची बैठक सोमवारी पार पडली, या बैठकीत गेल्या लोकसभा निवडणुकीत जिंकलेल्या १८ जागा लढवण्याची भूमिका पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी घेतली. ज्या चार जागांवर गेल्या लोकसभा निवडणुकीत पराभव झाला होता त्या जागांबाबत एकनाथ शिंदेंनी निर्णय घ्यावा, असं पक्षाच्या वरिष्ठ नेत्यानं म्हटलं आहे.शिवसेनेच्या कालच्या बैठकीमध्ये समन्वय समिती स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला. याशिवाय खासदार राहुल शेवाळे आणि मिलिंद देवरा यांना मुंबईतील लोकसभा निवडणुकीच्या तयारीला लागण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. भाजप, एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वातील शिवसेना आणि अजित पवार यांच्या नेतृत्त्वातील राष्ट्रवादी काँग्रेस किती जागा लढवणार हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.
महाविकास आघाडीचं लोकसभेचं जागावाटप का रखडलं? कोणत्या मतदारसंघांबाबत तिघांचं एकमत होणं बाकी?
शिवसेनेनं गेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपसोबतच्या युतीत २३ जागांवर लोकसभा निवडणूक लढवली होती. शिवसेनेचे १८ खासदार विजयी झाले होते. शिवसेनेच्या १८ पैकी १३ खासदारांनी एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला तर ५ खासदारांनी उद्धव ठाकरेंसोबत राहण्याचा निर्णय घेतला.
Read Latest Maharashtra News And Marathi News

शिवसेना लोकसभेच्या १८ जागा लढवणार यावर खासदारांच्या बैठकीत सहमती झाली असल्याची माहिती आहे. गेल्या आठवड्यात भाजपकडून शिवसेनेसाठी १२ जागा सोडल्या जाऊ शकतात अशी माहिती समोर आल होती. त्याबाबत गजाजन कीर्तिकर यांनी तो फॉर्म्युला फेटाळला होता. गजाजन कीर्तिकर यांनी एकनाथ शिंदे यांनी त्यांच्यासोबत आलेल्या १३ खासदारांच्या भविष्याचा विचार केला पाहिजे, असं म्हटलं होतं. ही माझी वैयक्तिक मतं असून पक्ष काय भूमिका घेईल, हे माहिती नसल्याचं देखली त्यांनी स्पष्ट केलं होतं.
महायुतीचं जागावाटप अंतिम टप्प्यात, नवा फॉर्म्युला चर्चेत, शिवसेना राष्ट्रवादीला समान जागा, भाजपला किती?
गजानन कीर्तिकर यांनी भाजपकडून देण्यात आलेला ३२-१२-४ जागांचा फॉर्म्युला फेटाळत असल्याचं देखील म्हटलं होतं. गेल्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेनं लढवलेल्या जागांपैकी रायगड, शिरुर, छत्रपती संभाजीनगर, अमरावती आणि सातारा या जागेवर पराभव स्वीकारावा लागला होता. त्यापैकी सातारा वगळता इतर जागांवर शिवसेनेनं विद्यमान खासदारांना उमेदवारी दिली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed