Ahilyanagar Man ends life : दुपारी सागर निंबाळकर हा शिवाजीनगर परिसरातील एका भाड्याच्या खोलीत राहणाऱ्या महाविद्यालयीन तरुणीकडे आला होता.
सागर सखाराम निंबाळकर (वय २५, रा. श्रीगोंदा स्टेशन) असे जीव दिलेल्या तरुणाचे नाव असून तो जिल्हा सहकारी बँकेत नोकरी करत होता. मंगळवारी दुपारी सागर निंबाळकर हा शिवाजीनगर परिसरातील एका भाड्याच्या खोलीत राहणाऱ्या महाविद्यालयीन तरुणीकडे आला होता.
नेमकं काय घडलं?
सागर आणि तरुणीत काही वेळ संभाषण झाल्यानंतर दोघांमध्ये अचानक शाब्दिक बाचाबाची झाल्याचे समोर आले आहे. वाद वाढल्यानंतर सागरने अचानक टोकाचे पाऊल उचलत खोलीत असलेल्या कपडे वाळत घालण्याच्या दोरीचा वापर करून तरुणीसमोरच गळफास घेतला. ही घटना तिच्या डोळ्यासमोर घडल्याने ती घाबरून गेली. तिच्या आरडाओरडीनंतर परिसरातील नागरिकांनी धाव घेतली.
Sukhoi Crash : वायुसेनेचं लढाऊ सुखोई विमान कोसळलं, फ्लाइट लेफ्टनंट पूर्वेश दुरगकरांसह दोघा वैमानिकांनी प्राण गमावले
पोलिस घटनास्थळी दाखल
घटनेची माहिती मिळताच श्रीगोंदा पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. सागरला तत्काळ उपचारासाठी श्रीगोंद्यातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी तपासणी करून त्याला मृत घोषित केले. या घटनेनंतर परिसरात मोठी गर्दी झाली होती.
राज्यसभेची उमेदवारी मिळताच रामदास आठवलेंची कविता; CM फडणवीसांसह सगळेच खळखळून हसले
पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करुन बॉडी शवविच्छेदनासाठी पाठवली आहे. यानंतर मयताचा नातेवाईक किरण तुकाराम निंबाळकर (वय ३५) यांनी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.
Crime News : स्वयंपाकावरुन सासूशी वाद, 35 वर्षीय इंजिनिअर तरुणीने आयुष्य संपवलं, चार वर्षांचं लेकरु मातृत्वाला मुकलं
आयुष्य संपवण्याचे कारण अद्याप अस्पष्ट
सागरने जीव देण्यामागे नेमके कारण काय आहे, प्रेमसंबंधातून वाद झाला की इतर काही कारण आहे का, याबाबत शहरात विविध चर्चा सुरू आहेत. मात्र अधिकृत कारण तपास पूर्ण झाल्यानंतरच स्पष्ट होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणाचा पुढील तपास श्रीगोंदा पोलीस करत आहेत.
