• Fri. Mar 6th, 2026
    Sagar Moholkar Firing : सागर मोहोळकर प्रकरणात मोठी घडामोड; ‘मुलगा मारहाण करतो’, बापाची घटनेआधी दोन दिवसांपूर्वीच तक्रार

    Jamkhed Sagar Moholkar Firing : अहिल्यानगरमधील जामखेडमध्ये कुख्यात गुंड सागर मोहोळकरवर झालेल्या गोळीबार प्रकरणात एक मोठी बातमी समोर आली आहे. त्यामुळे पोलीस अधिक तपास करत आहेत.

    जामखेड सागर मोहोळकर गोळीबार प्रकरण(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    अनिकेत यादव, अहिल्यानगर : अहिल्यानगरमधील जामखेडमध्ये पुन्हा एकदा मोठी घटन घडली आहे. कुख्यात गुंड आणि पैलवान अशी दुहेरी ओळख असलेला सागर मोहोळकर याच्यावर झालेल्या बेछूट गोळीबारानंतर आता या प्रकरणाला नवं आणि धक्कादायक वळण मिळालं आहे. हा हल्ला गँगवॉरचा परिणाम आहे की कौटुंबिक वादातून रचलेला कट? यावर तर्क-वितर्कांचा पूर आला आहे.

    निलेश घायवाळ कनेक्शन; जुना वाद पुन्हा ऐरणीवर

    सागर मोहोळकर हे नाव चर्चेत आलं ते एका धाडसी आणि वादग्रस्त घटनेमुळे. पुण्यातील कुख्यात गुंड निलेश घायवाळ याच्या कानशिलात लगावल्याची घटना गुन्हेगारी जगतात खळबळ उडवणारी ठरली होती. 11 एप्रिल 2025 रोजी धाराशिव जिल्ह्यातील आंदरुड येथील यात्रेत भर मैदानात ही घटना घडली होती. त्या दिवसापासून मोहोळकर अनेकांच्या निशाण्यावर असल्याची चर्चा होती. त्यामुळे अलीकडील गोळीबार हा त्या गँगवॉरचाच पुढचा अध्याय आहे का? असा संशय व्यक्त केला जात आहे. स्थानिक गुन्हेगारी टोळ्यांचा किंवा घायवाळ गटाचा हात असण्याची शक्यता पोलीस तपासत आहेत.
    Maharashtra TimesNagpur Purvesh Duragkar : भारतीय वायुसेनेचं लढाऊ सुखोई विमान कोसळलं, महाराष्ट्राचे सुपुत्र फ्लाइट लेफ्टनंट पूर्वेश दुरुगकर शहीद

    दोन दिवसांपूर्वीच वडिलांची तक्रार

    या प्रकरणाला खरा धक्का बसला तो नव्या माहितीनंतर. गोळीबाराच्या अवघ्या दोन दिवसांपूर्वीच सागर मोहोळकरच्या वडिलांनी जामखेड पोलीस ठाणे येथे त्याच्याविरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल केला होता. तक्रारीत ‘मुलगा मारहाण करतो’, असा आरोप करण्यात आला होता. त्यानंतरच सागरवर सात राउंड फायर करण्यात आले. म्हणूनच आता प्रश्न उपस्थित होतोय की, हा हल्ला गँगवॉरचा बदला? की कौटुंबिक वादातून कोणी साधला सूड? की दोन्ही घटनांचा काही खोलवर संबंध आहे? असे प्रश्न निर्माण होत आहेत.

    गुन्हेगारीचा काळा इतिहास

    सागर मोहोळकर हा केवळ पैलवान नाही, तर गुन्हेगारी क्षेत्रातील पक्का खेळाडू म्हणून ओळखला जातो. त्याच्यावर हत्येचे दोन गुन्हे दाखल आहे. तुरुंगात असतानाही आणखी एका कैद्याची हत्या केल्याची माहिती समोर आली आहे. स्थानिक पातळीवरील अनेक वाद, हाणामाऱ्या आणि दहशत या सगळ्या पार्श्वभूमीमुळे त्याच्यावरचा हल्ला हा जुन्या वैरातूनच झाला असावा, असा प्राथमिक अंदाज पोलिसांकडून वर्तवला जात आहे.
    Maharashtra TimesCrime News : कॉलेज विद्यार्थिनीच्या खोलीतच 25 वर्षीय बँक कर्मचाऱ्याने जीव दिला, तरुणीचा आरडाओरडा, निंबाळकर कुटुंब शोकसागरात

    जामखेडमध्ये भीतीचं सावट

    गोळीबाराच्या घटनेनंतर जामखेडमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. सात राउंड फायर, चार गोळ्या अंगात आणि तरीही सागर बचावला, ही बाबही चर्चेचा विषय ठरली आहे. गुन्हेगारी टोळ्यांमधील वैर, वैयक्तिक राग की कौटुंबिक कट? या प्रश्नांची उत्तरं तपासानंतरच स्पष्ट होतील. पोलीस सर्व शक्य कोनातून तपास करत असून सीसीटीव्ही फुटेज, मोबाईल लोकेशन आणि जुने गुन्हेगारी रेकॉर्ड तपासत आहेत. सागर मोहोळकर प्रकरण आता केवळ गोळीबारापुरतं मर्यादित राहिलेलं नाही तर ते जामखेडच्या गुन्हेगारी विश्वातील सत्तासंघर्षाचं प्रतीक बनलं आहे.

    प्रशांत पाटील

    लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत संजय पाटील २०१९ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये सिनीयर डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत असताना राज्यभरातील ग्रामीण भागातील बातम्या, राजकीय बातम्यांची आवड, हायपरलोकल बातम्या, क्राइम बातम्या अर्थात विशेष घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सतत प्रयत्न असतो. गावाखेड्याकडच्या बातम्या, शेतकऱ्यांचा प्रश्न, शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत. यापूर्वी थोडक्यात न्यूज पोर्टल, आधान न्यूज पोर्टल, महाराष्ट्र टाइम्स डिजिटल आणि सकाळ मीडिया ग्रुप या संस्थांमध्येही कामाचा अनुभव असून पुण्यातील गरवारे महाविद्यालयातून पत्रकारितेत पदवी प्राप्त केली आहे.… आणखी वाचा