सुजय विखे काय म्हणाले?
प्रत्येकाच्या मनामध्ये आकांक्षा आणि अपेक्षा असणं स्वाभाविक आहे. मी आयुष्यभर खासदार राहीन, असं कधी म्हटलेलं नाही. माझी पाच वर्ष मी जनतेच्या सेवेसाठी दिली, त्यांचं आयुष्य बदलण्यासाठी दिली, ते आयुष्य बदलताना पाहून माझं मन भरुन येतं. ज्या जबाबदारीसाठी जनतेने मला पाच वर्ष निवडून दिलं, ती पाच वर्ष मी यशस्वीरित्या पूर्ण केल्याचं समाधान आहे.
पुढची पाच वर्ष मलाच दिली पाहिजेत, असा माझा हट्टही नाही. त्यामुळे ज्या लोकांची इच्छा-आकांक्षा असेल, अहमदनगरची लोकसभा निवडणूक लढवण्याची, हा निर्णय जिल्हा स्तरावर तर होणार नाही, पक्ष स्तरावर केला जाईल, पक्षाला योग्य तो माणूस मिळेल, त्याला संधी मिळेल, आणि कोणालाही संधी मिळाली तरी सगळे मोदींसाठीच काम करत आहेत. नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान करायचं हा निश्चय आहे, असं सुजय विखे यांनी सांगितलं.
Read Latest Maharashtra News Updates And Marathi News
तुतारी बाबतीत मीच एकटा बोललो असं नाही, मी आता एका कार्यक्रमाला होतो, बहुजन रयत परिषदेचे लक्ष्मण ढोबळे तिथे होते. त्यांनी भाषणात एक उल्लेख केला, तो मी सांगतो. ते म्हणाले की राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला दिलेलं तुतारी हे निवडणूक चिन्ह चुकलं आहे. मी नाही म्हणालो बरं का, तुम्ही परत माझ्या तोंडात वाक्य द्याल.. ते म्हणाले की हे चिन्ह चुकलंय, तुतारी नव्हे यांना खंजीर मिळायला पाहिजे होतं, असं सुजय विखे म्हणाले.