• Mon. Mar 16th, 2026

    Mumbai Water Cut: मुंबईत 24 तास पाणीपुरवठा बंद! गोरेगावमधील अनेक भागांमध्ये परिणाम; लिंक रोडच्या कामांमुळे फटका

    Mumbai Water Cut: मुंबईत 24 तास पाणीपुरवठा बंद! गोरेगावमधील अनेक भागांमध्ये परिणाम; लिंक रोडच्या कामांमुळे फटका

    Goregaon Water Cut: गोरेगावमधील अनेक भागांमध्ये 24 तासांसाठी पाणी पुरवठा बंद करण्यात येणार आहे. दादासाहेब फाळके चित्रनगरीदरम्यान उभारण्यात येणाऱ्या उड्डाणपुलाच्या कामामुळे

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    मुंबई: शहरातील गोरेगाव-मुंलुंड लिंक रोडच्या कामाचा फटका आता पाणीपुरवठ्याला बसणार आहे. गोरेगाव पूर्व येथे 24 तास पाणीपुरवठा बंद करण्यात येणार आहे. मंगळवार, 10 मार्च रोजी सकाळी 9 वाजल्यापासून ते बुधवार, 11 मार्च सकाळी 9 वाजेपर्यंत पाणी पुरवठा बंद राहणार आहे अशी माहिती मुंबई महापालिकेने शुक्रवारी दिली आहे.

    कशामुळे पाणी पुरवठा खंडीत?

    गोरेगाव-मुलुंड लिंक रोडच्या पहिल्या टप्प्याचं काम सुरू आहे. यामध्ये दादासाहेब फाळके चित्रनगरी ते दिंडोशी न्यायालयापर्यंत उड्डाणपूल उभारण्यात येत आहे. यामध्ये दादासाहेब फाळके चित्रनगरीजवळ एक पोहच रस्ता बांधण्यात येत असून त्यामुळे या भागात जलवाहिनीचे काम हाती घेण्यात येणार आहे. या कामांत 750 मीटर व्यासाच्या जलवाहिनीच्या जोडणीचं काम 10 ते 11 मार्चदरम्यान करणार आहे. यामुळे गोरेगावमधील पी पूर्व आणि पी दक्षिण विभागीतील काही परिसरांमध्ये पाणी पुरवठा खंडीत होणार आहे. दरम्यान, काही भागांत कमी दबाने पाणी पुरवठा केला जाणार आहे.Maharashtra TimesMumbai-Pune Expressway: मुंबई-पुणेदरम्यान तिसरा द्रुतगती मार्ग, लोणावळा-खोपोली नवा रस्ता; बोगदे, उड्डाणपुलांचा समावेश

    कुठे होणार परिणाम?

    पी पूर्व वॉर्डमध्ये शिवशाही प्रकल्पात रात्री 11.45 ते सकाळी 5.45पर्यंत नियमित पाणी पुरवठा सुरू राहणार आहे. श्रीकृष्ण नगर आणि इंदिरा गांधी संशोधन संस्थेमध्ये पहाटे 3.30 ते सकाळी 9.00 दरम्यान नियमितपणे पाणी पुरवठा सुरू राहील. पी साउथ वॉर्डमध्ये उपग्रह टॉवर, संतोष नगर, माळी नगर, हेबल पाडा, उमरशेठ पाडा, नागरमोडे पाडा, सुनील मैदान, फिल्म सिटी रोड परिसरात मध्यरात्री 12 ते पहाटे 3 पर्यंत पाणी पुरवठा सुरू राहील. इतर वेळेत पाणी पुरवठा पूर्णपणे बंद राहणार आहे.

    Maharashtra TimesMumbai News: मुंबईत जलमार्गाचे जाळे विस्तारणार, 11 नव्या मार्गांवर 24 टर्मिनल उभारणार; नवीन जेट्टीसह वाढवण बंदराचाही विकास

    दरम्यान, पी साउथ वॉर्डमधील मोहन गोखले रोड, कृषणा वाटिका रोड, साई मार्ग आणि आर्य भास्कर रोडवर मध्यरात्री 12 ते पहाटे 3 पर्यंत नियमित पाणी पुरवठा सुरू राहणार आहे. इतर वेळेत कमी दाबाने पाणीपुरवठा सुरू असेल. महापालिकेने रहिवाशांना काटकसरीने पाण्याचा वापर करून पाणी साठवून ठेवण्याचा सल्ला दिला आहे. तसेच काम पूर्ण झाल्यानंतर काही दिवस पाणी गढूळ दिसू शकते त्यामुळे पाणी फिल्टर करून किंवा उकळून पिण्याचा सल्ला त्यांना देण्यात आला आहे.

    सानिया कदम

    लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम, मटा ऑनलाईनमध्ये कन्सल्टंट पदावर कार्यरत आहे. प्रामुख्याने क्राइम, सिव्हिक आणि पॉलिटिक्स या बातम्या कव्हर करते. याआधी सहा महिने महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमध्ये कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून काम केले आहे. त्या काळात कॉलेज इव्हेंट्स, शैक्षणिक उपक्रम आणि सोशल मीडियावरील ट्रेंड्सवर बातम्या केल्या. मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून BMM मध्ये पदवी घेतल्यानंतर सध्या के.सी. महाविद्यालयात MA in Communication and Journalism करत आहे. इंटरनॅशनल घडामोडी आणि पॉप कल्चर हे विषय विशेष आवडीचे असून इंग्लिश आणि मराठी या दोन्ही भाषेत वाचन व लेखन करण्याची आवड आहे.… आणखी वाचा