• Sun. Mar 8th, 2026
    Pune Crime : पाणी मागून तरुणीच्या हाताला धरलं, म्हणाला ‘तू खूप सुंदर दिसतेस’; पुण्यात डिलिव्हरी बॉयने मर्यादा ओलांडली, गुन्हा दाखल

    पुण्याच्या शिवाजीनगरमध्ये पाणी पिण्याच्या बहाण्याने डिलिव्हरी बॉयने महिलेचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ‘तू खूप सुंदर दिसतेस’ म्हणत गैरवर्तन करणाऱ्या श्रीधर कांबळेवर गुन्हा दाखल झाला आहे.

    ऑनलाईन डिलिव्हरी बॉयने महिलेचा विनयभंग केला(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    स्नेहल निमगिरे, पुणे : तहान लागल्याचा बहाणा करून डिलिव्हरी बॉयने महिलेला पाणी आणायला सांगितले. पाण्याचा ग्लास घेताच ग्राहक महिलेच्या हाताला स्पर्श करून “तू खूप सुंदर दिसतेस” असे म्हणून डिलिव्हरी बॉयने ग्राहक तरुणीचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना घडली. याप्रकारणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    नेमकी घटना काय?

    मिळालेल्या माहितीनुसार, शिवाजीनगरमध्ये राहणाऱ्या एका तरुणीने घरासाठी काही साहित्य मागवण्यासाठी ऑनलाईन डिलिव्हरी सेवा वापरली होती. ६ मार्च रोजी सायंकाळी सुमारे पाचच्या सुमारास संबंधित डिलिव्हरी बॉय तिच्या घरी पार्सल घेऊन आला. तरुणीने दरवाजा उघडून पार्सल स्वीकारले. त्यानंतर डिलिव्हरी बॉयने पिण्यासाठी पाणी मागितले. मानवतेच्या नात्याने तरुणीने त्याला पाणी दिले. मात्र त्याच वेळी डिलिव्हरी बॉयने मर्यादा ओलांडत तिच्या हाताला स्पर्श केला आणि “तू खूप सुंदर दिसतेस” असे म्हणत गैरवर्तन केल्याचा आरोप आहे. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे तरुणी घाबरून गेली. त्यावेळी घरात तिचे लहान बाळ आणि सासूही उपस्थित होते. हा प्रकार घडल्यानंतर तरुणीने लगेचच आपल्या पतीला सर्व सांगितले. त्यानंतर दोघांनी मिळून शिवाजीनगर पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार नोंदवली.

    Maharashtra TimesUddhav Thackeray : एकनाथ शिंदेंच्या गावात निसर्गोपचार केंद्राची अर्थसंकल्पात घोषणा; ‘मानसोपचार केंद्र’ म्हणत उद्धव ठाकरेंचा खोचक टोला

    डिलिव्हरी बॉयची ओळख

    तक्रारीनंतर पोलिसांनी ॲपमधील डिलिव्हरीची माहिती तपासून संबंधित डिलिव्हरी बॉयची ओळख पटवली. श्रीधर कांबळे असे आरोपीचे नाव असून त्याच्याविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचे काही फुटेज सीसीटीव्हीतही आढळल्याचे समोर आले आहे.
    दरम्यान, आरोपीचा शोध घेण्यासाठी शिवाजीनगर पोलिसांनी तपास सुरू केला असून पुढील कारवाई केली जात आहे.

    Maharashtra TimesNashik Crime : प्रसिद्ध आयुर्वेदिक तज्ज्ञ डॉ. मनीषा जेजुरकरांचं टोकाचं पाऊल, राहत्या घरात आयुष्य संपवलं

    सर्वसामान्य चिंतेत

    घरपोच सेवा देणाऱ्या ॲप्समुळे अनेकांची कामे सोपी झाली आहेत. मात्र त्याच सेवेमधून असा धक्कादायक प्रकार पुण्यात घडल्यामुळे पुणेकरांच्या मनात भीती निर्माण झाली आहे. माणसांवर विश्वास ठेवायचा की नाही? गरजू व्यक्तींवर विश्वास ठेऊन मदत करायची की नाही? आणि ऑनलाईन सेवांचा वापर करायचा की नाही? असे अनेक प्रश्न सर्वसामान्यांच्या मनात घर करू लागले आहेत.

    सुनिल लाटे

    लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे, हे एक पत्रकार आहेत. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ येथून बी.ए व एम.ए. पत्रकारितेचं पदव्यूत्तर शिक्षण पूर्ण केलं आहे. कॉलेज जीवनातच ‘दैनिक दिव्य मराठी’मध्ये पत्रकारितेचं प्रत्यक्ष प्रशिक्षण घेतलं आहे. दोन वर्षे ‘लोकसत्ता डॉट कॉम’साठी ‘फोटोगॅलरी व वेबस्टोरी’ या विभागात काम केलं आहे. ते ६ ऑक्टोबर २०२५ पासून ‘महाराष्ट्र टाईम्स’ ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. राजकारण, मनोरंजन, क्रीडा या विषयांच्या लिखाणात आवड आहे. याशिवाय काव्य लेखन, गीत लेखन आणि सादरीकरणातही स्वारस्य आहे. फोटोग्राफी, फोटो, व्हिडिओ संपादनातही खास रस आहे… आणखी वाचा