मुंबई : लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीमधील जागा वाटपाची चर्चा अंतिम टप्प्यात असल्याची माहिती आहे. महायुतीमधील जागा वाटपात भाजपचा वरचष्मा राहणार आहे. भाजपनं २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत लढवलेल्या जागांपेक्षा अधिक जागा ते २०२४ ला लढवू शकतात. भाजपला २८ तर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला १० आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला १० जागा मिळू शकतात, असं वृत्त टाइम्स ऑफ इंडिया या वृत्तपत्रात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्याच्या माहितीच्या आधारे प्रसिद्ध करण्यात आलं आहे.भाजपनं २०१९ च्या लोकसभेला २६ तर शिवसेनेनं २२ जागा लढवल्या होत्या. भाजपनं २४ जागांवर तर शिवसेनेनं १८ जागांवर विजय मिळवला होता. राष्ट्रवादीच्या नेत्यानं नाव जाहीर न करण्याच्या अटीवर दिलेल्या माहितीनुसार लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपाचा फॉर्म्युला अंतिम टप्प्यात आलेला आहे.
सध्या शिवसेनेचे १८ खासदार आहेत. त्यापैकी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत १३ खासदार आहेत तर उद्धव ठाकरे यांच्यासोबत एकूण सहा खासदार आहेत. यामध्ये दादरा नगर हवेलीच्या खासदारांचा देखील समावेश आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी मात्र जागा वाटपाबाबत अंतिम निर्णय झाला नसल्याचं म्हटलं आहे. भाजपनं २६ जागांवरील त्यांचा दावा कायम ठेवलेला आहे. भाजपकडून लोकसभेच्या जागांबाबत तडजोड केली जाण्याची शक्यता कमी आहे. भाजपनं २०१९ ला २६ जागा लढवल्या होत्या. यावेळी भाजप त्यापेक्षा जास्त जागा लढवू शकतो, अशा चर्चा आहेत.
Read Latest Maharashtra News And Marathi Newsमहायुतीचा आणखी एक फॉर्म्युला
सध्या शिवसेनेचे १८ खासदार आहेत. त्यापैकी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत १३ खासदार आहेत तर उद्धव ठाकरे यांच्यासोबत एकूण सहा खासदार आहेत. यामध्ये दादरा नगर हवेलीच्या खासदारांचा देखील समावेश आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी मात्र जागा वाटपाबाबत अंतिम निर्णय झाला नसल्याचं म्हटलं आहे. भाजपनं २६ जागांवरील त्यांचा दावा कायम ठेवलेला आहे. भाजपकडून लोकसभेच्या जागांबाबत तडजोड केली जाण्याची शक्यता कमी आहे. भाजपनं २०१९ ला २६ जागा लढवल्या होत्या. यावेळी भाजप त्यापेक्षा जास्त जागा लढवू शकतो, अशा चर्चा आहेत.
Read Latest Maharashtra News And Marathi News
महायुतीचा आणखी एक फॉर्म्युला
लोकसभेसाठी महायुतीच्या जागा वाटपाचा आणखी एक फॉर्म्युला चर्चेत आहे. त्यानुसार भाजप ३२ लोकसभा मतदारसंघात निवडणूक लढवले. एकनाथ शिंदे यांची शिवसेना १२ जागावंर तर अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस ४ जागांवर निवडणूक लढवू शकते. अजित पवार यांनी कर्जतच्या अधिवेशनात सातारा, बारामती, शिरुर आणि रायगडच्या जागेसह इतर जागा लढवणार असल्याचं म्हटलं होतं. शिवसेनेतील पक्ष फुटीनंतर जे खासदार उद्धव ठाकरे यांच्या सोबत आहेत त्यांच्या मतदारसंघात निवडणूक लढवण्याबाबत अजित पवार आग्रही होती. धाराशिव आणि परभणीची जागा मिळावी अशी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका होती.