• Sat. Sep 21st, 2024

शिवसेनेच्या कार्यक्रमात स्थानिक खासदार गवळीच अनुपस्थित; म्हणतात बिन बुलाये मेहमान कशी जाऊ?

शिवसेनेच्या कार्यक्रमात स्थानिक खासदार गवळीच अनुपस्थित; म्हणतात बिन बुलाये मेहमान कशी जाऊ?

यवतमाळ : पोहरादेवी येथे संत सेवालाल महाराज यांचा जयंती सोहळा आणि नेर येथे शिवसेनेचा पक्ष प्रवेश कार्यक्रम गुरुवारी पार पडला. या दोन्ही कार्यक्रमाला शिवसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील, मंत्री दादा भुसे, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, पालकमंत्री संजय राठोड हजर होते. मात्र यवतमाळ-वाशीम लोकसभा मतदारसंघाच्या खासदार भावना गवळी मात्र दोन्ही कार्यक्रमाच्या ठिकाणी दिसल्या नाही.

दोन्ही कार्यक्रमात नेत्यांच्या भाषणात पालकमंत्री संजय राठोड यांनी केलेल्या विकासकामांचे कौतुक झाले. पण त्यांच्या पक्षाच्या खासदार भावना गवळी यांचा उल्लेखही कुणी केला नाही. त्यामुळे खासदार गवळी यांच्या अनुपस्थितीची चर्चा होत आहे. दरम्यान, खासदार भावना गवळी या गुरुवारी यवतमाळ येथील त्यांच्या कार्यालयातच बसून होत्या, अशी माहिती आहे.
राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघ अध्यक्षपदी हर्षवर्धन पाटील; शाहांची सूचना, पवारांना धक्का
याबाबत खासदार भावना गवळी यांची प्रतिक्रिया जाणून घेतली असता, ‘मी पाच वेळा खासदार राहिले आहे. पण पक्षाचा माझ्या मतदारसंघात कार्यक्रम होत असताना मला बोलविण्यात आले नाही. जर बोलावलेच नाही तर बिन बुलाये मेहमान कसे जाणार’, असे त्या म्हणाल्या.

गारपीटग्रस्त भागाची पाहणी, खासदार भावना गवळींसमोर प्रश्नांचा पाढा मांडत शेतकऱ्यांचा सरकारवर संताप

Read Latest Maharashtra News Updates And Marathi News

तर शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख पराग पिंगळे म्हणाले, ‘खासदार भावना गवळी कार्यक्रमाला का आल्या नाही हे माहीत नाही. कदाचित त्या पक्षाच्या मेळाव्यासाठी कोल्हापूरला असतील. खासदार डॉ. शिंदे व मंत्री गुलाबराव पाटील, मंत्री दादाजी भुसे व पालकमंत्री संजय राठोड हे ज्या हेलिकॅप्टरमधून आले, त्यात जागाच नसल्याने त्या येऊ शकल्या नसेल.’ असे ते म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed