Shraddha Jadhav : ‘उबाठा’च्या श्रद्धा जाधव यांचा शिवसेनेच्या उमेदवार मानसी सातमकर यांनी केवळ एका मताने पराभव केला.
ठाकरेंच्या उमेदवाराचा पराभव
चुरशीच्या ठरलेल्या एफ उत्तर व एफ दक्षिण प्रभाग समिती अध्यक्षपदाच्या निवडणुकीत संख्याबळ अधिक असल्याने शिवसेना (उबाठा) पक्षास समिती अध्यक्षपद मिळण्याचा होरा असतानाच ऐनवेळी काँग्रेस आणि समाजवादी पक्षाचे नगरसेवक गैरहजर राहिले. यामुळे ‘उबाठा’च्या श्रद्धा जाधव यांचा शिवसेनेच्या उमेदवार मानसी सातमकर यांनी केवळ एका मताने पराभव केला.
Jishnu Dev Varma : महाराष्ट्राच्या राज्यपालपदी नवी नियुक्ती, रात्रीत दिल्लीतून हालचाली, प. बंगालच्या गव्हर्नरचाही राजीनामा
काँग्रेस नगरसेवकांनी व्हिप धुडकावला
या निवडणुकीसाठी काँग्रेसने व्हिप जारी केला असतानाही काँग्रेसच्या नगरसेविका आयशा सूफियान वणू, सपच्या इरम सिद्दिकी गैरहजर राहिल्याने मानसी सातमकर यांना भाजपची पाच आणि शिवसेनेची तीन अशी आठ मते मिळाली. श्रद्धा जाधव यांना ‘उबाठा’ची सहा आणि मनसेचे एक अशी सात मते मिळाली. त्याचवेळी, अन्य पाच प्रभाग समित्यांच्या निवडणुकीत, भाजपचे तीन नगरसेवक बिनविरोध निवडून आले असून, काँग्रेस पक्षाचे दोन नगरसेवक अध्यक्षपदी निवडून आले आहेत.
Mumbai News : धर्मापेक्षा सुरक्षा महत्त्वाची, मुंबई विमानतळाजवळ नमाज व्यवस्थेची मागणी हायकोर्टाने फेटाळली
आर मध्य आणि आर उत्तर प्रभाग समिती अध्यक्षपदाच्या निवडणुकीत विरोधी पक्षाने एकही उमेदवार न दिल्याने सत्ताधारी भाजपचे नगरसेवक प्रकाश दरेकर यांची बिनविरोध निवड झाली. ‘सी’ आणि ‘डी’ प्रभाग समिती अध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपचे उमेदवार आकाश पुरोहित यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची व आर दक्षिण प्रभाग समिती अध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपच्या लीना देहरकर यांची बिनविरोध निवड झाली. पी पूर्व आणि पी पश्चिम प्रभाग समिती अध्यक्षपद निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार हैदरअली अस्लम शेख हे १० मते मिळवून निवडून आले. ‘ए’, ‘बी’ आणि ‘ई’ प्रभाग समितीच्या अध्यक्षपद निवडणुकीत काँग्रेसचे नगरसेवक ज्ञानराज निकम यांची निवड झाली.
