• Mon. Nov 25th, 2024

    राज्यात व्यावसायिक कलाकारांचे पहिलेवहिले क्लस्टर नागपुरात, एकाच छताखाली विविध सुविधा, कसा होणार फायदा?

    राज्यात व्यावसायिक कलाकारांचे पहिलेवहिले क्लस्टर नागपुरात, एकाच छताखाली विविध सुविधा, कसा होणार फायदा?

    म. टा. प्रतिनिधी, नागपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आत्मनिर्भर भारत अंतर्गत आयात कमी करत निर्यात वाढविण्यावर भर दिला आहे. याअंतर्गत अव्यक्त असे व्यक्त करण्याची क्षमता असणाऱ्या मूर्तिकार, शिल्पकार, चित्रकार आदी कलाकारांच्या कलेला प्रोत्साहन देण्यासाठी व्यावसायिक कलाकारांचे राज्यातील पहिलेवहिले क्लस्टर नागपुरात होणार आहे.

    पारंपरिक कला आणि कलाकारांना सध्या चांगले दिवस आले आहे. छोटेसे शिल्प, पेंटिंग, म्युरल, मेटलचे शोपीस लोक खरेदी करू लागले आहेत. अनेक आकर्षक कलाकृती लोकांच्या दिवाणखान्याची शोभा वाढविताहेत. हुनर हाट, ऑरेंज फेस्टिव्हलसारख्या उपक्रमांमुळे स्थानिक कलावंतांची उत्पादने बाहेर जात आहेत. निर्यातक्षमता असूनही अनेक कलाकारांच्या कलाकृती शहरातच खितपत पडून आहेत. ही स्थिती बदलून येथील कलाकारांना जागतिक दर्जा प्राप्त व्हावा, या उद्देशाने आर्टिफॅक्ट्स होमब्रु फाउंडेशन ही कलाकारांची संघटना स्थापन करण्यात आली आहे. या फाउंडेशनद्वारे बुटीबोरी एमआयडीसी येथे व्यावसायिक कलाकारांचे भारतातील पहिले क्लस्टर सुरू करण्यात येत आहे. या फाउंडेशनमध्ये मास्टर ऑफ फाइन आर्ट्स (एमएफए) झालेले शंभर कलाकार आहेत. त्याशिवाय एमएफए न झालेल्या परंतु कलाकार असलेले २५० जण आमच्याशी जुळलेले आहेत. हे सर्व कलाकार विविध कलाकृती साकारतात. प्रत्येक जण स्वत:चा व्यवसाय स्वतंत्ररीत्या करतात. त्यांना एकत्रित करून त्यांच्या उत्पादनाच्या निर्मितीत येणारा खर्च कमी करणे, त्यांना साहाय्य करून जागतिक बाजारपेठ मिळवून देण्यासाठी क्लस्टर काम करणार आहे.

    १९६७ पूर्वीच्या ज्यांच्या कुणबी नोंदी आहेत, त्यांना मराठा आरक्षणाचा लाभ मिळणार नाही : मुख्यमंत्री

    डीपीआर मार्चपर्यंत

    व्यावसायिक कलाकारांचे क्लस्टर एक एकर जागेवर होणार आहे. या क्लस्टरचा डीटेल स्टडी रिपोर्ट मंजूर झाला असून लवकरच मार्चपर्यंत डीटेल प्रोजेक्ट रिपोर्ट अर्थात डीपीआर होईल. क्लस्टर होणाऱ्या जागेवर एक कॉमन फॅसिलिटी सेंटरदेखील (सीएफसी) होणार आहे. यामुळे कलाकारांना एका छताखाली विविधा सुविधा उपलब्ध होणार आहेत.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *