मी जिथं होतो तिथं प्रामाणिकपणे काम केलेलं आहे. भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर प्रामाणिकपणे काम करण्याची ग्वाही देणार आहे. आगामी निवडणुकीत भाजपला जास्तीत जास्त जागा मिळतील यासाठी प्रयत्न करणार आहे. राजकारण हे सेवेचं माध्यम आहे. मी कुणावरही टीका करणार नाही, असं अशोक चव्हाण म्हणाले.
मी पक्ष सोडल्यानंतर कोणावरही टीका करणार नाही. नरेंद्र मोदी यांनी सबका साथ सबका विकास हा मंत्र घेऊन देशात विकासाचं काम केलं आहे. त्यांच्या कामानं प्रभावित झालेलो आहे. विरोधी पक्षात असताना सरकारनं जे चांगलं काम केलेलं असेल तर त्याचं कौतुक केलं पाहिजे. महाराष्ट्राची एक वेगळी राजकीय संस्कृती राहिलेली, असं अशोक चव्हाण म्हणाले.
Read Latest Maharashtra News And Marathi News
सभागृहात कटुता आली असली तरी सभागृहाबाहेर सर्वांनी चांगले संबंध जपलेले आहेत. मी नवी सुरुवात करत आहे, भाजपच्या ध्येयधोरणांनुसार काम करणार आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांगतील त्याप्रमाणं काम करणार आहे. मी यापूर्वीच्या पक्षातील सहकाऱ्यांचे आभार मानतो. माझा हा वैयक्तिक निर्णय होता, असंही अशोक चव्हाण यांनी म्हटलं. सर्व गोष्टींवर आज बोलण्यापेक्षा योग्यवेळी बोलणार असल्याचं चव्हाण म्हणाले. सकारात्मक आणि विकासाचं धोरण डोळ्यासमोर ठेवून भाजपमध्ये आलो असल्याचं अशोक चव्हाण म्हणाले.