• Sun. Mar 15th, 2026

    70 वर्षाच्या मैत्रीचा रशियाला विसर

    ByMH LIVE NEWS

    Mar 15, 2026
    70 वर्षाच्या मैत्रीचा रशियाला विसर

    इराण आणि अमेरिकेत भयंकर स्थिती आहे. मोठे हल्ले केले जात आहेत. जे आखाती देश अगोदर सुरक्षित वाटत त्याठिकाणी मोठे हल्ले होत आहेत. होर्मुज खाडी इराणकडून बंद ठेवण्यात आले. ज्या देशांच्या जहाजांना परवानगी नाही, असे जहाज जात असतील तर थेट पेटवून दिले जात आहेत. या युद्धाला 15 दिवस झाले पण युद्ध काही थांबत नाही. यासोबतच इराणकडून मोठे संकेत देण्यात आले. काही महिने काही वर्षही युद्ध सुरू राहू शकते, असे इराणकडून स्पष्ट करण्यात आले. मात्र, या युद्धात इतर देश संकट झाले. कच्च्या तेलाच्या किंमतीमध्ये मोठी वाढ झाली. 200 प्रति बॅरल तेलाचा भाव होईल, असेही इराणकडून सांगण्यात आले. कच्च्या तेलाच्या किंमती नियंत्रणात ठेवण्याकरिता अमेरिकेकडून प्रयत्न केली जात आहेत. मात्र, त्यांना अजिबात यश मिळत नाही. रशियाकडून जगातील देशांनी तेल खरेदी करावे, असे आवाहन अमेरिकेकडून करण्यात आले.

    सध्याच्या परिस्थितीमध्ये भारत अनेक देशांच्या संपर्कात आहे. विशेष म्हणजे रशियाच्या संपर्कात आहे. मात्र, यादरम्यान रशियाने भारतासोबतची 70 वर्षांची मैत्री विसरून भारताला देखील बाजार भावाप्रमाणेच तेल खरेदी करावे लागेल असे सांगितले. भारत बाजारा भावाप्रमाणेच रशियाकडून तेल खरेदी करत आहे. यापूर्वी रशिया भारताला त्यांच्या तेलावर मोठी सूट देत. मात्र, आता रशियाची भारताबद्दलची भूमिका बदलल्याचे बघायला मिळत आहे.

    जवळपास 50 टक्के अतिरिक्त पैसे भारताला मोजावे लागत आहे. रशियन तेलावरील जवळपास सर्वच सूट काढण्यात आली. या मुद्द्यावर रशियन सरकारशी चर्चा सुरू आहे. मात्र, रशिया आपल्या भूमिकेवर ठाम आहे. निर्णय रशियाकडून बदलला जात नाहीये. भारताने सातत्याने तणाव कमी करण्याचे आणि युद्ध संपण्याची भूमिका घेतली. भारतात इराण आणि अमेरिका युद्धामुळे एलपीसी गॅसचा मोठा तुटवडा निर्माण झाला. भारतात थेट व्यावसायिक सिलेंडर वितरण बंद करण्यात आले.

    यादरम्यानच्या काळात भारताने इराण, अमेरिका आणि इस्रायल यांच्यासोबत चर्चा केली. जेणेकरून ऊर्जा सुरक्षा आणि सुरक्षित सागरी वाहतूक यासह भारताच्या प्राधान्यांना अधोरेखित करता येईल. रशियाने अगोदरच भारताला दणका देत स्पष्ट केले की, भारताला पूर्वीप्रमाणे कच्च्या तेलामध्ये सूट मिळणार नाही. सध्याच्या घडीला रशियाच्या तेलाची जगभरात प्रचंड मागणी आहे. या युद्धात सर्वाधिक फायदा रशियाचाच होत आहे. पूर्वीप्रमाणे सूट मिळावी, याकरिता भारताकडून अजूनही रशियासोबत चर्चा सुरू आहे.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed