Mangaon-Indapur Bypass: मुंबई-गोवा महामार्गावरील इंदापूर-माणगाव बायपासचं काम गेली अनेक वर्ष रखडलं आहे. हे काम येत्या जूनपर्यंत पूर्ण करून मार्ग खुला करण्याचं आश्वासन खासदार सुनील तटकरे यांनी दिलं आहे.
बायपास पूर्ण होणे अशक्य?
बायपास मार्गातील काळ नदीवरील पूल, रेल्वेवरील उड्डाणपूल तसेच गोद नदीवरील पूल या महत्त्वाच्या संरचनांचे काम अद्याप अपूर्ण आहे. या पुलांचे बांधकाम पूर्ण करून त्यासोबतचे सर्व्हिस रोड, भरणकाम आणि अंतिम डांबरीकरण करण्यासाठी किमान एक वर्षाचा कालावधी लागेल, असा अंदाज व्यक्त होत आहे. तसेच, पुलांच्या दोन्ही बाजूंना भराव करून रस्ता स्थिर होण्यासाठीही काही महिने लागतात. त्यामुळे पुढील दोन-तीन महिन्यांत बायपास पूर्ण होणे अशक्य असल्याचे सूत्रांनी सांगितले.
Pune Metro: मेट्रोतून उतरलं की रिक्षा तयार! पुण्यातील ‘नळ स्टॉप’ मेट्रो स्थानकावर प्रवाशांसाठी नवी सुविधा; किती असेल भाडे?
पावसाळ्यात काम मंदावते तर काही ठिकाणी ते पूर्णपणे थांबते. बायपाससाठीचा कालावधी आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. काम वेगाने सुरू ठेवले आणि कोणत्याही तांत्रिक आणि प्रशासकीय अडचणी आल्या नाहीत तरही बायपासची एक बाजू ३१ मेपर्यंत सुरू करण्याचा प्रयत्न राहणार असल्याचे सांगण्यात येते.
दिवंगत मुख्यमंत्री अजित पवार यांनी माणगाव येथील आनंद भवन येथे वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत घेतलेल्या बैठकीत अधिकाऱ्यांनी माणगाव बायपास पूर्ण होण्यासाठी किमान तीन वर्षांचा कालावधी लागू शकतो, असे सांगितले होते. यामुळे एकीकडे जूनपर्यंत बायपास सुरू करण्याचे राजकीय आश्वासन, तर दुसरीकडे प्रत्यक्ष कामातील अडथळे, कामाची गती आणि तांत्रिक वास्तव यांमध्ये मोठा विरोधाभास दिसून येत आहे. त्यामुळे बायपास नेमका कधी पूर्ण होणार, असा प्रश्न वाहतूककोंडीने त्रस्त असलेले गोवा मार्गावरील प्रवासी आणि माणगाव व इंदापूर परिसरातील नागरिकांकडून विचारला जात आहे.
Purandar IT Park: पुरंदरमध्ये ‘आयटी पार्क’ उभारणार, हिंजवडीवरील ताण कमी करण्याचं उद्दिष्ट; नव्या विमानतळाजवळ प्रकल्प प्रस्तावित
शिवभक्त सुरेश पवार यांचे निधन
महाड येथील कोकणकडा मित्रमंडळाचे अध्यक्ष सुरेश पवार (६२) यांचे शनिवारी सरेकर आळी येथील निवासस्थानी निधन झाले. सायंकाळी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. रायगड जिल्ह्यातील सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रात सुरेश पवार यांचे योगदान मोठे होते. रायगडावरील शिवराज्याभिषेक सोहळा कार्यक्रमात त्यांचा सिंहाचा वाटा असे. महाड येथे त्यांनी शिवकालीन वस्तूंचे संग्रहालय उभारले. कोकणकडा मित्रमंडळ संस्थेच्या माध्यमातून त्यांनी असंख्य तरुणांना प्रेरणा दिली. त्यांच्या निधनामुळे एक महान समाजसेवक हरपला आहे,’ अशी भावना इतिहासप्रेमी अजय धनावडे यांनी व्यक्त केली.
