• Mon. Nov 25th, 2024

    भिशी लावताना सावधान! नागपुरात ५ हजार जणांचे १ कोटी गायब, काय घडलं?

    भिशी लावताना सावधान! नागपुरात ५ हजार जणांचे १ कोटी गायब, काय घडलं?

    म.टा. प्रतिनिधी, नागपूर : भिसीच्या बहाण्याने सुमारे पाच हजार ग्राहकांना एक कोटीने गंडा घालण्यात आला. याप्रकरणी कपिलनगर पोलिसांनी संकल्प सेल्स कॉर्पोरेशनचा संचालक सुनील सुखदेव मेश्राम व अन्य आरोपींविरुद्ध फसवुणकीसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला.

    काय घडलं?

    शुभम उमेश वानखेडे (वय २८, रा. राय आशियाना, अयप्पानगर, मानकापूर) याने दिलेल्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला. शुभम हा गेल्या तीन वर्षांपासून सच्चिदानंद रिॲल्टीज कंपनीत विक्री प्रतिनिधी आहे. डिसेंबर २०२१मध्ये संकल्प सेल्स कॉर्पोरेशनमध्ये एक हजार रुपयांची भिसी सुरू असून १६ महिने भिसी भरल्यास १६ हजारावर त्यावर चार हजार रुपये व्याज असे एकूण २० हजार मिळतील, असे त्याला समजले. कॉर्पोरेशनतर्फे दर महिन्याला लकी ड्रॉ निघत असून त्यात सोफा, टीव्ही आलमारी मिळत असल्याचेही त्याला कळाले. शुभम व त्याच्या नातेवाइकांनी ३ लाख ४० हजार, सुषमा व त्यांच्या नातेवाइकांनी २८ लाख, ज्योत्स्ना यांनी ११ लाख, सतवंतसिंग यांनी नऊ लाख, राणी यांनी एक लाख, सिमरन यांनी चार लख, सुरेखा यांनी ३० लाख रुपये अशाप्रकारे पाच हजार ग्राहकांची एक कोटी २४ लाखांपेक्षा अधिकची रक्कम घेऊन सुनील पसार झाला.
    डॉलरच्या नादात कागदाची बंडले; नवी मुंबईतील व्यावसायिकाची २ लाखांची फसवणूक, नेमकं काय घडलं?

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *