Pimpri Chinchwad Crime : राज्यात गुन्हेगारीचं दिवसेंदिवस प्रमाण वाढत चाललं आहे. त्याचदरम्यान, एक मोठी घटना समोर आली आहे. या घटनेनं संपूर्ण शहरात खळबळ उडाली आहे.
80 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले
आशफाक इस्माईल पठाण (वय 32) असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव आहे. विशेष म्हणजे आरोपीने बीएपर्यंत शिक्षण घेतलेले असूनही तो मोटारसायकल चोरी करत असल्याचे तपासात समोर आलं आहे. पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत वाढत्या मोटारसायकल चोरीच्या घटनांवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलीस आयुक्तांनी गुन्हे शाखांना विशेष मोहीम राबवण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार गुन्हे शाखा युनिट-2च्या पथकाने परिसरातील सुमारे 70 ते 80 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासून संशयिताचा माग काढला.
Pune Gas Cylinder: बुकिंग केल्यानंतर गॅस सिलिंडर कधी मिळणार? पुण्याच्या जिल्ह्याधिकाऱ्यांकडून स्पष्टीकरण, साठेबाजांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश
40 मोटारसायकली जप्त
गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी आशफाक पठाण याला शिताफीने ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्याने मोटारसायकल चोरी केल्याची कबुली दिली. पोलिसांनी त्याच्याकडून 21 लाख 66 हजार रुपये किंमतीच्या 40 मोटारसायकली जप्त केल्या. तपासादरम्यान आरोपी चोरीच्या मोटारसायकली या फायनान्स कंपनीचे हप्ते थकलेली वाहने असल्याचे सांगून स्वस्त दरात विकत असल्याचे उघड झाले. या प्रकरणात चोरीच्या मोटारसायकली खरेदी केल्याप्रकरणी मुकुंद उद्धवराव हारदास (वय 25, रा. पाटोदा, ता. परतूर, जि. जालना) यालाही पोलिसांनी अटक केली आहे. मध्यस्थीच्या माध्यमातून तो 20 ते 25 हजार रुपयांना या दुचाकी विकत होता.
Nashik Crime : नाशिकच्या तरुणाची बॉडी सापडली, 15 दिवस मारेकऱ्याच्या शोधासाठी मोर्चे, आरोपी निघाले बायको आणि प्रियकर
स्लेंडर मोटारसायकलींची विशेष आवड
पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपीला स्लेंडर मोटारसायकलींची विशेष आवड असल्यामुळे सुरुवातीला त्याने एक मोटारसायकल चोरी केली. त्यानंतर त्याला चोरीची सवय लागली आणि मागील दोन ते तीन वर्षांपासून तो पुण्यात येऊन मोटारसायकली चोरी करत असल्याचे तपासात समोर आले आहे. त्याच्याकडून विविध वाहनांच्या अनेक चाव्याही जप्त करण्यात आल्या आहेत. आरोपीविरुद्ध यापूर्वीही वाहन चोरीचे 10 गुन्हे दाखल असून या प्रकरणाचा पुढील तपास गुन्हे शाखा युनिट-2 करत आहे.
