• Thu. Mar 12th, 2026

    अभिनेत्री हंसिका मोटवानीने पती सोहेल खटुरियाला कायदेशीररित्या दिला घटस्फोट 

    ByMH LIVE NEWS

    Mar 12, 2026
    अभिनेत्री हंसिका मोटवानीने पती सोहेल खटुरियाला कायदेशीररित्या दिला घटस्फोट 

    अभिनेत्री हंसिका मोटवानी आणि तिचा पती सोहेल खटुरिया यांच्या घटस्फोटाच्या चर्चा गेल्या वर्षभरापासून होत्या. लग्नानंतर काही महिन्यांतच त्यांच्यात खटके उडू लागले होते. त्यानंतर आता हे दोघं कायदेशीररित्या विभक्त झाल्याची माहिती समोर येत आहे. मुंबईतील वांद्रे फॅमिली कोर्टात हंसिका आणि सोहेल यांनी घटस्फोटाच्या कागदपत्रांवर अखेर स्वाक्षरी केली आहे. परस्पर संमतीने दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे. हंसिका आणि सोहेलने डिसेंबर 2022 मध्ये लग्न केलं होतं. गेल्या काही काळापासून त्यांच्यात मतभेद होते आणि ते सोडवण्यासाठी त्यांनी बरेच प्रयत्नसुद्धा केले. परंतु त्यातून काहीच निष्पन्न झालं नाही. अखेर एकमेकांच्या मनात कटुता बाळगून एकत्र राहण्यापेक्षा घटस्फोट घेतलेला बरा, असं दोघांनी ठरवलं.

    जेव्हा एखाद्या मोठ्या सेलिब्रिटीचा घटस्फोटो होतो, तेव्हा कोट्यवधी रुपयांच्या पोटगीच्या बातम्या समोर येतात. परंतु हंसिका आणि सोहेल यांचा खटला इतर प्रकरणांपेक्षा खूप वेगळा आहे. न्यायालयात सादर केलेल्या कागदपत्रांनुसार आणि प्रतिज्ञापत्रांनुसार, हंसिका किंवा सोहेलने पोटगीसाठी किंवा नुकसान भरपाईसाठी कोणताही दावा किंवा मागणी केलेली नाही. सोहेलकडून पोटगी नको असल्याचं हंसिकाने कोर्टात स्पष्ट केलं आहे.

    https://www.instagram.com/p/C32hJN9yKWI/embed/captioned/?cr=1&v=14&wp=540&rd=https%3A%2F%2Fwww.tv9marathi.com&rp=%2Fentertainment%2Fhansika-motwani-sohael-khaturiya-divorce-after-4-years-of-grand-wedding-how-much-alimony-actress-asked-1624546.html#%7B%22ci%22%3A0%2C%22os%22%3A18208.200000000186%2C%22ls%22%3A18198.400000000373%2C%22le%22%3A18200.700000000186%7D

    हंसिकाचं प्रतिनिधित्व करणारे वकील अदनान शेख म्हणाले, “लग्नानंतर हे जोडपं काही दिवस एकत्र राहिले, परंतु हळूहळू त्यांना जाणवलं की त्यांच्या स्वभावात, विचारांमध्ये आणि लाइफस्टाइलमध्ये मोठा फरक आहे. त्यातून त्यांच्यात छोट्या छोट्या कारणांवरून वाद होऊ लागले. क्षुल्लक गोष्टींवरून हंसिका आणि सोहेल यांच्यात भांडणं व्हायची. यामुळे एकाच छताखाली एकत्र राहणं अधिकाधिक कठीण होत चाललं होतं. म्हणून त्यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला.”

    हंसिका मोटवानी आणि सोहेल खटुरिया यांचं लग्न 2022 मधील सर्वांत चर्चेत असलेल्या लग्नांपैकी एक होतं. 4 डिसेंबर 2022 रोजी जयपूरमधील 450 वर्षे जुन्या मुंडोटा किल्ला आणि राजवाड्यात त्यांचा लग्नसोहळा पार पडला होता. या राजवाड्यातील प्रीमियम सुइट्सची किंमत एका रात्रीसाठी 60 हजार रुपयांपर्यंत होती. हंसिका आणि सोहेलने तीन दिवसांसाठी इथे बुकिंग गेली होती. या संपूर्ण लग्नाचा खर्च सुमारे 20 कोटी रुपये इतका होता. या लग्नाचं थेट प्रक्षेपण ओटीटी प्लॅटफॉर्मवर करण्यात आलं होतं.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *