ड्रग्ज तस्कर ललित पाटील ससून रुग्णालयातून पलायन झाल्यानंतर ससून प्रशासन तसेच पोलीस प्रशासनेच्या कार्यक्षमतेवर शंका उपस्थित केली जात आहे. त्यासोबत १६ नंबर वॉर्डमध्ये उपचारांच्या नावाखाली आश्रय घेणाऱ्या नामांकीत गुन्हगारांची यादी प्रसारित झाल्यानंतर राज्यात मोठी खळबळ माजली आहे. या प्रकरणावर जाब बसवण्यासाठी अजित पवारांनी सर्व प्रथम आज ससूनचे डीन संजीव ठाकूर यांना बैठकीसाठी बोलवलं आहे. ससूनमध्ये घडलेल्य प्रकाराबाबत सविस्तर माहिती घेऊन अजित पवार डीन संजीव ठाकूर यांच्यावर कारवाई करतील का ? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
ड्रग्ज तस्कर ललित पाटीलला फरार होऊन १० दिवस पूर्ण झाले असताना ललित पाटील अद्याप फरार घोषित आहे. पोलिसांनी मोठी यंत्रणा लावून ही पाटील सापडला नाही. या बाबत पुणे सत्र न्यायालयाने ही पोलिसांना फटकारले होते. मात्र, ललित पाटीलबाबत कोणतीही माहिती पोलिसांकडून मिळत नाही म्हणून पोलिसांच्या हातातून ललित पाटील फरार झाला का ? अशा प्रकारचे प्रश्न उपस्थित केले जात आहे. याबाबत ही माहीती घेण्यासाठी पुणे पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी ही बैठकीला बोलवण्यात आलं आहे
पुण्याचे पालकमंत्री म्हणून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज पुण्याचा कारभार हाती घेतला आहे. आज सकाळ सातच्या ठोक्याला कामांना सुरवात करत सगळ्या अधिकाऱ्यांची दमछाक केली आहे. पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची बैठक संपवल्यानंतर पुणे जिल्हा आढावा बैठकीला सुरवात केली आहे. आणि या बैठकीसाठी ससून रुग्णालयाचे डीन डॉ. संजीव ठाकूर, पुणे पोलीस आयुक्त रितेश कुमार, आणि पुण्याचे महत्वाचे अधिकारी उपस्थित होते. मात्र, अजित पवार पुण्यात पालकमंत्री म्हणून कारभार हाती घेतल्यावर पुण्यामध्ये काही बद्दल घडलीतील का ? हे पाहणं आत महत्वाचं ठरणार आहे.
अजित पवारांनी रेश्मा भोसलेंना भेट नाकारली
येरवडा कारागृहात बंद असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार अनिल भोसले यांच्या पत्नी रेश्मा भोसले आणि आणि त्यांच्या मुलाला अजित पवारांनी भेट नाकारली. अजित पवारांना भेटण्यासाठी रेश्मा भोसले पुण्यातील सर्किट हाऊसला आल्या होत्या. पुण्यातील शिवाजीराव भोसले सहकारी बँक घोटाळ्यात अनिल भोसले आणि रेश्मा भोसले हे आरोपी आहेत. २०१७ ला झालेल्या महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादीची उमेदवारी नाकारल्यानंतर रेश्मा भोसले भाजपच्या पाठिंब्यावर नगरसेविका बनल्या. मात्र, तेव्हापासून अजित पवार आणि भोसले कुटुंबात वितुष्ट आले. २०१९ला महाविकास आघाडीचे सरकार आल्यावर अनिल भोसलेंना बँक घोटाळ्यात अटक करण्यात आली, तर रेश्मा भोसले यांना जामीन मिळाला. मात्र, आजारपणाचे कारण देऊन अनिल भोसले ससुन रुग्णालयात भरती होते. मात्र, ललित पाटील ससुन रुग्णालयातून पळून गेल्यानंतर कैद्यांच्या १६ नंबर वॉर्डमधून अनेक कैद्यांना पुन्हा येरवडा कारागृहात पाठवण्यात आले. त्यामधे माजी आमदार अनिल भोसले यांचाही समावेश आहे. या कारणासाठीच रेश्मा भोसले अजित पवारांच्या भेटीला आल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. मात्र, अजित पवार यांनी रेश्मा भोसले यांना भेटण्यास नकार दिला.