• Tue. Mar 17th, 2026

    पैशांसाठी अभिनेत्रीने तब्बल 25 बी ग्रेड चित्रपटांमध्ये केलं काम

    ByMH LIVE NEWS

    Mar 12, 2026
    पैशांसाठी अभिनेत्रीने तब्बल 25 बी ग्रेड चित्रपटांमध्ये केलं काम

    अभिनयक्षेत्रात काम करणाऱ्या कलाकारांची लाइफस्टाइल अत्यंत आलिशान असते, असं अनेकांना वाटतं. परंतु समोर जितकं त्यांचं आयुष्य झगमगतं दिसतं, त्यात तितक्याच संघर्षांना ते सामोरं जात असतात. या संघर्षांविषयी काही कलाकार मोकळेपणे व्यक्त होतात, तर काही जण त्यावर बोलणं टाळतात. प्रसिद्ध भोजपुरी अभिनेत्री मोनालिसा नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिच्या खासगी आयुष्यातील समस्यांविषयी खुलासा केला. मोनालिसाची प्रसिद्धी आणि लाइफस्टाइल पाहून अनेकांना वाटत असेल की तिच्याकडे कसलीच कमतरता नाही. परंतु पैशांसाठी दोन-चार नव्हे तर तब्बल 25 बी-ग्रेड चित्रपटांमध्ये काम केल्याचं तिने कबुल केलं.

    सिद्धार्थ कन्ननला दिलेल्या मुलाखतीत मोनालिसा म्हणाली, “मला तौबा-तौबा चित्रपटाची ऑफर मिळाली होती. या चित्रपटाचं बजेट खूप कमी होतं. या चित्रपटात पायल रोहतगीची मुख्य भूमिका होती आणि तिच्यासोबत मी सहाय्यक अभिनेत्रीच्या भूमिकेत होती. या चित्रपटानंतर मी प्रकाशझोतात आली. त्यानंतर मला एकानंतर एक चित्रपटांचे ऑफर्स येऊ लागले होते. मी जवळपास 25 बी-ग्रेड चित्रपटांमध्ये काम केलंय. त्यापैकी अर्ध्याहून अधिक चित्रपट तर थिएटरमध्ये प्रदर्शितच झाले नाहीत. खरंतर यासाठी मी कृतज्ञ आहे की ते रिलीज झाले नाहीत. पण मला पडद्यावर इंटिमेट सीन करताना कधीच कोणती समस्या आली नाही.”

    https://www.instagram.com/p/DVkqKF9kWXi/embed/captioned/?cr=1&v=14&wp=540&rd=https%3A%2F%2Fwww.tv9marathi.com&rp=%2Fentertainment%2Fmonalisa-reveals-worked-in-25-b-grade-movies-for-money-did-not-hesitate-for-doing-intimate-scenes-1624197.html#%7B%22ci%22%3A0%2C%22os%22%3A17582.900000000373%2C%22ls%22%3A16912.400000000373%2C%22le%22%3A17575.200000000186%7D

    “मी आणि माझा पती विक्रांत अजूनही आर्थिकदृष्ट्या स्थिर नाही. कारण आम्हा दोघांच्या पालकांना आरोग्याच्या समस्या आहेत. त्यामुळे आम्ही जेवढं कमावतो, ते सर्व पैसे उपचारासाठी खर्च होतात. पण सुदैवाने राहण्यासाठी मोठं घर आहे आणि वीज, पाणी यांसारख्या मुलभूत गोष्टींसाठी संघर्ष करावा लागत नाही. कारण एकेकाळी आम्ही या समस्यांचाही सामना केला आहे. त्यामुळे त्या परिस्थितीत मला जे काम मिळत गेलं, ते मी करत गेली. त्याचा मला पश्चात्ताप नाही”, असं तिने पुढे स्पष्ट केलं.

    मोनालिसा आज एक मोठी आणि प्रसिद्ध स्टार असली तरी एक काळ असा होता जेव्हा तिला छोट्या भूमिकेतही समाधान मानावं लागायचं. तिने बंगाली चित्रपटांमधून सुरुवात केली आणि त्यानंतर तिने भोजपुरी, बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम केलं. करिअरच्या सुरुवातीच्या काळात तिने ‘धुरंधर’मधील राकेश बेदी यांच्यासोबतही काम केलंय. ती मुंबईत आली तेव्हा तिने ‘बाज: द बर्ड इन डेंजर’ या बॉलिवूड चित्रपटात एक छोटी भूमिका साकारली होती.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed