• Sun. Mar 15th, 2026
    पत्नीशी अनैतिक संबंध असल्याचा संशय, पतीने वेटरचा जीव घेतला, ठाण्यात भातशेतामध्ये बॉडी टाकली

    Thane Waiter killed : मुंबईतील महापे येथील एका कॅन्टिनमध्ये काम करत असलेल्या वेटरची बॉडी शिळ-डायघरमधील पिंपरी गावातील भातशेतात आढळली होती

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    म. टा. प्रतिनिधी, ठाणे : पत्नीशी अनैतिक संबंध असल्याच्या संशयातून एका वेटरची डोक्यात लोखंडी हातोडा मारून हत्या करण्यात आली. या प्रकरणातील आरोपी पतीला शिळ-डायघर पोलिसांनी अटक केली आहे. विशेष म्हणजे अवघ्या चार तासांत पोलिसांनी या गुन्ह्याचा छडा लावला. सीसीटीव्ही कॅमेऱ्यातील चित्रीकरण आणि तांत्रिक माहितीआधारे पोलिसांनी शिळ गावात राहणाऱ्या ३९ वर्षीय व्यक्तीला अटक केली.

    काय आहे प्रकरण?

    शिळ-डायघरमधील पिंपरी गावातील भातशेतात प्रकाश बिसा याची बॉडी आढळून आली होती. मूळचा उत्तर प्रदेशातील प्रकाश नवी मुंबईतील महापे येथील एका कॅन्टिनमध्ये काम करत होता. त्याच्या हत्येप्रकरणी मंगळवारी शिळ-डायघर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.
    Maharashtra TimesMumbai Crime : लग्नाच्या वीस वर्षांनी मूल, सोसायटीत कारच्या धडकेत मुंबईतील चिमुकल्याचा मृत्यू, कुटुंब म्हणालं पार्किंग वादातून जीव घेतला

    सीसीटीव्हीवरुन उलगडा

    आरोपींच्या शोधासाठी वरिष्ठ पोलिस निरीक्षक श्रीराम पोळ यांनी दोन पथकांची स्थापना केली. सीसीटीव्ही कॅमेऱ्यातील चित्रीकरण आणि तांत्रिक माहितीआधारे पोलिसांनी शिळ गावात राहणाऱ्या एका ३९ वर्षांच्या व्यक्तीला अटक केली. त्याच्या चौकशीत या हत्येचा उलगडा झाला.

    Maharashtra Heat Wave Update | महाराष्ट्रात उष्णतेचा कहर ! तापमान ४० पार, कुठे यलो अर्लट?

    अनैतिक संबंधांचा संशय

    आपल्या पत्नीशी प्रकाश याचे अनैतिक संबंध असल्याचा आरोपीला संशय आला होता. याच रागातून त्याने प्रकाश याला मद्य पिण्याच्या बहाण्याने पिंपरी गावातील भातशेतामध्ये नेले आणि नंतर डोक्यात लोखंडी हातोडा मारून प्रकाश याची हत्या केली, अशी माहिती पोलिसांनी दिली. आरोपीला अटक करण्याची कामगिरी पोलिस निरीक्षक गजेंद्र राऊत, सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रशांत खरात, अनिल राजपूत, योगेश लामखडे यांच्या पथकाने केली.
    Maharashtra TimesNashik Crime : नाशिकच्या तरुणाची बॉडी सापडली, 15 दिवस मारेकऱ्याच्या शोधासाठी मोर्चे, आरोपी निघाले बायको आणि प्रियकर

    मुळेश्वर डोंगरावर आढळली बॉडी

    दुसरीकडे, नाशिक जिल्ह्यातील बागलाण तालुक्यातील दोदेश्वर परिसरातील मुळेश्वर डोंगरावर बुधवारी (दि.११) एका तरुणाचं शव आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. सटाणा पोलिसांनी प्राथमिक तपास केल्यानंतर मृत तरुणाची ओळख पटवण्यात यश मिळवले. मृत तरुण हा आराई येथील रहिवासी असून, विष्णू बळीराम माळी (वय २५) असे त्याचे नाव आहे. पंचनामा व शवविच्छेदन प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर बॉडी नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आली. त्याचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, याचे कारण स्पष्ट झालेले नाही.

    अनिश बेंद्रे

    लेखकाबद्दलअनिश बेंद्रेअनिश सतीश बेंद्रे, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक पदावर कार्यरत आहेत. गेल्या तीन वर्षांपासून ते मटासोबत काम करत आहेत. राजकीय, गुन्हेगारी आणि मनोरंजन या विषयातील बातम्यांमध्ये त्यांचा विशेष हातखंडा आहे. ब्रेकिंग न्यूजसोबतच निवडणूक विषयक विश्लेषण करण्यात त्यांना अधिक रस आहे. त्यांनी झेविअर्स कॉलेजमधून मास कम्युनिकेशनचे पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. आतापर्यंत एबीपी माझा, टीव्ही9 मराठीसह पत्रकारिता क्षेत्रात 12 वर्षांहून अधिक काळचा अनुभव त्यांना आहे… आणखी वाचा