म. टा. वृत्तसेवा, पनवेल : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यक्रमासाठी खारघरमध्ये आणि भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंच्या दौऱ्यासाठी पनवेल शहरातील खड्डे बुजविण्यात आला. महापालिका भाजपा नेत्यांच्या दौऱ्यासाठी काम करीत आहे, त्यामुळे महापालिकेत प्रशासकीय राजवट आहे की भाजपाची पगारी राजवट आहे असा सवाल महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी बुधवारी केला. पनवेलमध्ये बावनकुळेंच्या स्वागतासाठी ढोलताशा आणि डीजेचा गजर सुरू असताना महाविकास आघाडीने अनपेक्षितपणे निषेध आंदोलन केले.
पनवेल शहरातील शिवाजी चौक परिसर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या स्वागतासाठी सजवला होता. सकाळी ११ वाजताच्या दरम्यान ढोलताशांचा गजर, डीजेचा दणदणाट, भाजपा कार्यकर्त्यांची लगबग, लेझीम पथक आदीने शिवाजी चौकात स्वागताची तयारी होती. बावनकुळे येणारची चर्चां सुरू असताना अचानक शेकाप, शिवसेना ठाकरे गट आणि कॉग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर हातात पोस्टर घेवून मुक आंदोलन सुरू केले. हातात धरण्यात आलेल्या पोस्टरवर मंगळवारी रात्री शहरातील खड्डे असलेल्या रस्त्याचे डांबरीकरण केलेले फोटो होते. आयुक्त जनतेचे की भाजपाचे, प्रशासकीय राजवट की भाजपाची पगारी राजवट असा उल्लेख असलेले पोस्टर हातात धरून महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी महापालिका प्रशासन आणि भाजपाचा निषेध केला. शहरात अनेक रस्त्यांवर खड्डे असताना केवळ चंद्रशेकर बावनकुळे यांचा संकल्प महाविजय दौरा होणाऱ्या रस्त्यावरील खड्डे पालिकेने बुजविल्याबद्दल निषेध व्यक्त करण्यात आला. शेकापचे पनवेल जिल्हाध्यक्ष गणेश कडू, शिवसेने ठाकरे गटाचे प्रविण जाधव, कॉग्रेसचे हेमराज म्हात्रे यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या आंदोलनाला कार्यक्रम उपस्थित होते. अचानक सुरू झालेल्या आंदोलनामुळे काही वेळ भाजपाच्या कार्यक्रमात गोंधळ झाला. महाराजांच्या पुतळ्याकडे जाणाऱ्या गेटवर सुरू असलेले आंदोलन थांबविण्यासाठी पोलिसांनी अवघ्या काही मिनिटांमध्ये धाव घेतली. आमदार महेश बालदी यांना पुतळा परिसरात जाता आले नाही. पोलिसांना आंदोलकांना ताब्यात घेतल्यानंतर रस्ता मोकळा होताच बावनकुळेंच्या स्वागतासाठी आमदार महेश बालदी आणि प्रशांत ठाकूर पुढे आले. महाविकास आघाडीने केलेल्या आंदोलनाची चर्चां यावेळी सुरू होती.
रस्ता पाण्याने धुतला

संकल्प दौऱ्याच्या निमित्ताने पनवेल महापालिकेच्या वाहनांकडून रस्ता धुतल्याची माहिती शेकापचे गणेश कडून यांनी दिली. नागरिकांना पिण्यासाठी पाणि नसताना रस्ता पाण्याने धुतला जात आहे. भाजपा नेत्यांच्या दौऱ्यामुळे पनवेल शहरातील रस्ते चांगले होणार असतील तर पनवेल भाजपाने नेत्यांनी दर आठवड्याला पनवेलमध्ये फिरवावे असी उपहासात्मक टिका कडू यांनी केली. रस्त्यावर पाणि मारल्याबाबतचा जाब महापालिकेला विचारला जाईल असे त्यांनी सांगितले.