• Sat. Sep 21st, 2024

वाशी टोलनाक्यावरची वाहतूक कोंडी फुटणार, महिनाभरातच १० लेनचा ऐसपैस टोलनाका सुरु होणार

वाशी टोलनाक्यावरची वाहतूक कोंडी फुटणार, महिनाभरातच १० लेनचा ऐसपैस टोलनाका सुरु होणार

नवी मुंबई: मुंबईच्या प्रवेशद्वारावर असलेला वाशीचा टोलनाका हा नेहमी गजबजलेला असतो. याठिकाणी मुंबईत येणाऱ्या आणि शहरातून बाहेर पडणाऱ्या वाहनांची नेहमी गर्दी असते. त्यामुळे या टोलनाक्यावर अनेकदा वाहतूक कोंडी होते. परिणामी याठिकाणी वाहनांच्या लांबलचक रांगा लागून प्रवाशांचा तासनतास खोळंबा होता. यामुळे मनस्ताप होत असला तरी दुसरा कोणताही पर्याय नसल्याने प्रवाशांकडे हळहळ व्यक्त करण्यापलीकडे दुसरा कोणताही पर्याय उरत नाही. मात्र, आता प्रवाशांची ही अडचण दूर होणार आहे. कारण लवकरच नव्या आणि प्रशस्त रुपातील वाशीचा टोलनाका लवकरच कार्यान्वित होणार आहे.

टोलच्या दरात वाढ कशी होते? वाहन चालकांच्या आक्षेपांवर उपाय काय? वाचा टोल आकारणीचा रंजक इतिहास

वाशीच्या दिशेला असणारा १० मार्गिकांचा नवा पथकर नाका महिनाभरात कार्यरत होईल. त्यामुळे आता एका ठिकाणी वाहनांची गर्दी कमी होऊन वाहने दोन टोलनाक्यावर विभागली जातील. सध्या सुरू असलेला टोलनाका हा फक्त मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांसाठी असेल. तर नवा टोलनाका हा मुंबईहून पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांसाठी वापरला जाईल. त्यामुळे आता वाशी टोलनाक्यावरील वाहतूक कोंडीचा प्रश्न पूर्णपणे निकालात निघेल, असा दावा रस्ते विकास महामंडळाकडून करण्यात आला आहे.

मुंबईच्या वेशीवरील टोलबाबत मोठी बातमी: निर्णय सरकारच्याच हाती; मंत्रिमंडळाची भूमिका काय?

सध्याच्या वाशी टोलनाक्यावर एकूण १८ मार्गिका आहेत. त्यापैकी नऊ मार्गिका या मुंबईकडे तर उर्वरित नऊ पुण्याकडे जाणाऱ्या वाहनांसाठी वापरल्या जातात. परंतु, त्यात दहा मार्गिकांचा नवा टोलनाका वाशीच्या दिशेने झाल्यास एकाच ठिकाणी येणारी वाहनांची गर्दी कमी होईल. शीव-पनवेल महामार्गाचे काँक्रिटीकरण झाले असले तरी गेल्या काही वर्षांत या मार्गावरील वाहनांची संख्या मोठ्याप्रमाणावर वाढली आहे. काही वर्षांपूर्वी वाशी गावालगत असणारा असलेला जुना टोल नाका हलवून ते ठाणे खाडी पुलालगत आणण्यात आला होता. या बदलामुळे सुरुवातीच्या काळात या मार्गावरील येथील वाहतूक सुसह्य झाली. मात्र, आता वाहनांची संख्या वाढल्याने हा टोलनाकाही अपुरा पडू लागला होता. मुंबई-पनवेल आणि पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांच्या संख्येत सतत वाढ होत असल्याने हा टोलनाका सध्या वाहतूक कोंडीचे मोठे केंद्र ठरत आहे. परंतु, १० मार्गिकांच्या नव्या टोलनाक्यामुळे ही समस्या लवकरच संपुष्टात येईल.

मुंबई-गोवा महामार्ग प्रश्नी मनसेचं खळखट्ट्याक, राजापूर-हातिवले येथील टोलनाका मनसैनिकांनी फोडला

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed