छत्रपती संभाजीनगर : “तू मला खूप आवडतेस, तू मला भेट, अन्यथा तुझ्या भावाला जिवंत मारून टाकेन”, अशी धमकी देऊन १९ वर्षीय तरुणीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना सिल्लोड तालुक्यात घडली. दरम्यान, पीडित तरुणीने बदनामीच्या भीती पोटी विषारी द्रव्य प्राशन करुन आत्महत्या केली. तर बलात्काराचा गुन्हा दाखल झाल्याची माहिती मिळताच आरोपीने गळफास घेऊन आयुष्य संपवलं. ही घटना काल बुधवारी सकाळी ८ वाजेच्या सुमारास छत्रपती संभाजीनगर शहरात उघडकीस आली.
या प्रकरणी सिल्लोड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी मच्छिंद्र रामू घोडके (वय २५, रा. रेलगाव) असं बलात्कार करून नंतर गळफास घेऊन आयुष्य संपवलेल्या तरुणाचं नाव आहे. आरोपी मच्छिंद्र हा ओळखीच्या १९ वर्षीय तरुणीवर एकतर्फी प्रेम करत होता. मच्छिंद्रने त्या मुलीला “तू मला खूप आवडते, तू मला भेट अन्यथा तुझ्या भावाला जिवंत मारून टाकीन”, अशी धमकी देऊन त्याने १९ वर्षीय मुलीला भाड्याने घेतलेल्या रूमवर बोलवून तिच्यावर बलात्कार केला. पीडित मुलीने याबाबत तिच्या आईला सांगितले. यामुळे पीडित तरुणीचा भाऊ आणि आरोपी मच्छिंद्र यांच्यामध्ये हाणामारी झाली. यामध्ये दोघेही जखमी झाले यानंतर मच्छिंद्र घोडके या सिल्लोड येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथून त्याला छत्रपती संभाजीनगर येथे पाठवण्यात आले. मात्र, आरोपी मच्छिंद्र हा दवाखान्यात न जाता बहिणीच्या घरी गेला.

संपूर्ण घटनेमुळे पीडित मुलगी घाबरून गेली होती. बदनामीच्या भीतीपोटी तरुणीने विषारी द्रव्य प्राशन केले. दरम्यान, ही घटना नातेवाईकांच्या निदर्शनास येताच तरुणीला सिल्लोड येथील उपजिल्हा रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. या प्रकरणानंतर पीडितेच्या तक्रारीवरून सिल्लोड पोलीस ठाण्यामध्ये आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला गुन्हा दाखल झाल्याची माहिती मिळताच आरोपीने बहिणीच्या घरामध्ये गळफास घेऊन आयुष्य संपवलं.