दरम्यान या प्रकरणी अधिक माहिती अशी की, छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यात ग्रामपंचायत निवडणूक 2020-21 मध्ये पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत राखीव प्रवर्गातून निवडून आलेल्या उमेदवारांना जात प्रमाणपत्र मिळवण्यासाठी अडचणी आल्या होत्या. त्यामुळे राज्य शासनाने निवडून आलेल्या उमेदवारांना जात वैधता प्रमाणपत्र हे स्वतः सक्षम अधिकाऱ्यांसमोर सादर करण्याची मुदतवाढ दिली होती. दरम्यान याच काळामध्ये ग्रामपंचायत निवडणुकीत विजयी झालेल्या उमेदवारांना जात प्रमाणपत्र सादर करण्यासाठी प्रशासनाच्या वतीने १६ ऑक्टोबर रोजी तहसील कार्यालयामध्ये हजर राहण्याच्या नोटीस बजावण्यात आल्या. मात्र, नोटीस बजावताना पैठण तहसील कार्यालयाच्या निवडणूक विभागाने सरसकट पराभूत व विजयी उमेदवारांना आपण निवडून आले असल्याने १६ ऑक्टोबर रोजी तहसील कार्यालयामध्ये हजर राहावे, अशा नोटीस बजावल्या नोटीस बजावण्यात आल्या.
दरम्यान निवडणुकीमध्ये पराभूत झाल्यानंतरही थेट तहसील कार्यालयाकडून विजयी झाल्याचं नोटीस मिळताच गावागावांमध्ये राजकीय ड्रामा झाल्याचं बघायला मिळालं. पराभूत उमेदवारांच्या दारासमोर फटाके फुटले तर काही ठिकाणी गुलाल उधळण्यात आला. मात्र, ही बाब स्थानिक प्रशासनाच्या लक्षात येताच प्रशासनाच्या वतीने नोटीस पाठवण्यात आलेल्या ब्रह्मगव्हाण येथील काजल राठोड यांनी तहसील कार्यालयाशी संपर्क साधून विचारणा करण्यात आली. त्यावेळी निवडणूक विभागाने चुकून नोटीस पाठवण्यात आल्याची माहिती दिली दिली. तसेच पराभूत उमेदवारांनी जात वैधता प्रमाणपत्र सह तहसील कार्यालयामध्ये येऊ नये, असे देखील सांगण्यात आले.