• Mon. Nov 25th, 2024
    हात कापून हातात देईन! सी लिंकवर बाईक रोखताच महिलेची पोलिसांना शिवीगाळ; म्हणते मी भारत सरकार

    मुंबई: वांद्रे-वरळी सी लिंकवर एका दुचाकीस्वार महिलेनं पोलिसांशी हुज्जत घातली. त्यांना शिवीगाळ केली. घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ही घटना १५ सप्टेंबरला घडली. वांद्रे-वरळी सी लिंकवर दुचाकींना परवानगी नाही. तरीही महिला दुचाकी घेऊन सी लिंकवरुन प्रवास करत होती. त्यामुळे वाहतूक पोलिसांनी तिला रोखलं. यानंतर महिलेनं पोलिसांना शिवीगाळ सुरू केली.

    महिलेनं तिचं नाव नुपूर पटेल सांगितलं. आपण मध्य प्रदेशच्या जबलपूरहून आल्याचं ती म्हणाली. पोलिसांनी दुचाकी रोखताच तिनं शिवीगाळ सुरू केली. माझ्या दुचाकीला हात लावण्याची तुझी हिंमत कशी झाली? हात कापून हातात देईन, अशी धमकी तिनं दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महिलेनं सी लिंकच्या प्रवेशद्वारावर असलेल्या साईन बोर्डकडे दुर्लक्ष केलं. तिनं दुचाकी थेट सी लिंकवर दामटवण्यास सुरुवात केली.
    धावत्या बाईकवर सर्पदंश, तरुण कळवळत जागीच कोसळला; VIDEO पाहून अंगावर काटा येईल
    सी लिंकवर दुचाकी आणल्यानं पोलिसांनी महिलेला रोखलं. तेव्हा तिनं हुज्जत घातली. शिवीगाळ सुरू केली. पोलिसांनी तिला वाहनाची कागदपत्रं दाखवण्यास सांगितला. महिलेनं नकार दिला. पोलिसांनी तिला पोलीस ठाण्यात येण्याची सूचना केली. तेव्हा महिलेनं पोलिसांनाच धमकावण्यास सुरुवात केली. पोलिसांनी तिला दुचाकी रस्त्याच्या कडेला घेण्यास सांगितली. पण महिलेनं नकार दिला.

    महिला सी लिंकवरुन दक्षिण मुंबईकडे जात होती. मी कर भरते. तेव्हा कोणीही मला रस्त्यावर दुचाकी चालवण्यापासून रोखू शकत नाही, अशा शब्दांत तिनं हुज्जत घातली. मी भारत सरकार आहे. गाडीवर लिहिलं नसलं तरी मी भारत सरकार आहे. मी केवळ ५ मिनिटं थांबेन. त्यानंतर तुला उडवून निघून जाईन, अशी धमकी तिनं पोलीस कर्मचाऱ्याला दिली.
    कॅनडाच्या निषेधार्थ कॅनरा बँकेबाहेर भाजपचं आंदोलन; फोटो व्हायरल, पण खरं-खोटं काय?
    महिलेनं पोलीस कर्मचाऱ्याला धक्का दिला. तिच्याविरोधात बेदरकारपणे वाहन चालवल्याचा, सरकारी कर्मचाऱ्यावर हल्ला केल्याचा आणि त्यांच्या कामात बाधा आणण्याचा गु्न्हा नोंदवण्यात आला आहे. महिला मूळची मध्य प्रदेशची आहे. तिच्या दुचाकीची नोंदणी जबलपूरच्या एका रियल इस्टेट फर्मशी संबंधित आहे.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed