• Mon. Nov 25th, 2024

    एवढा अपमान करू नका, लवकर निर्णय घ्यावा, अन्यथा गाठ धनगर धनगराशी; उपोषणकर्त्या बंडगारांच्या कन्येचा इशारा

    एवढा अपमान करू नका, लवकर निर्णय घ्यावा, अन्यथा गाठ धनगर धनगराशी; उपोषणकर्त्या बंडगारांच्या कन्येचा इशारा

    अहमदनगर : वीस दिवसांपासून चौडी येथे उपोषणाला बसलेले माझे वडील सुरेश बंडगर आणि आण्णासाहेब रूपनवर यांच्या पोटात अन्नाचा कण नाही, तरीही सरकारला यांचे म्हणणे ऐकून घ्यायला वेळ नाही. धनगर समाजाचा एवढा अपमान करू नका, लवकर निर्णय घ्यावा, अन्यथा गाठ धनगर समाजाशी आहे; अशा इशारा उपोषणकर्ते सुरेश बंडगर यांची कन्या प्रतिक्षा बंडगर यांनी सरकारला दिला.

    पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या किर्ती स्तंभाशेजारी यशवंत सेनेच्यावतीने धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण मिळावे, यासाठी उपोषण सुरू आहे. यशवंत सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब दोडतले मुंबई येथे सरकारने आरक्षण संदर्भात बोलविलेल्या बैठकीला गेले होते. पण त्यावेळी झालेली चर्चा ही निष्फळ ठरली होती. त्यामुळे महाराष्ट्रातील धनगर बांधव अधिक आक्रमक झाला आहे.

    उपोषणकर्ते सुरेश बंडगर यांचे कूंटुब चौंडी येथे आले होते.यावेळी कुटुंबाला आपल्या भावना अनावर झाल्या होत्या. राज्यातील ३६ जिल्ह्यांतून लाखोंच्या संख्येने धनगर समाज बांधवांनी चौडी येथे येऊन धनगर आरक्षणासाठी बसलेल्या उपोषणकर्त्याना उत्स्फूर्तपणे पाठिंबा दिला. मोटारसायकल रँली पायी रँलीद्वारे घोषणा देत चौडी परिसर दणाणून सोडला. यावेळी शेकडो तरूणांनी सरकारच्या धोरणाविषयी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली. गेल्या ७० वर्षापासून तेवत ठेवलेला धनगर समाजाच्या आरक्षणाचा वटहुकुम जारी करण्यात यावा, अशी मागणी उपोषणास पाठिंबा देण्यासाठी आलेल्या महाराष्ट्रातील धनगर बांधवांनी केली आहे.

    चौंडीत धनगर समाजाचे उपोषण; उपोषणकर्ते आण्णासाहेब रुपनवर, सुरेश बंडगरांची पडळकरांकडून विचारपूस

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed