• Mon. Nov 25th, 2024
    काम संपवून घरी निघाल्या; अन् वाटेतच नियतीनं डाव साधला, गरोदर महिला पोलीसाचा दुर्दैवी अंत

    अमरावती: एका मद्यपी दुचाकीस्वाराने समोरील दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात दुचाकीवर मागे बसलेल्या गाडगेनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील महिला पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला आहे. ही घटना पहाटे समाधी मंदिरासमोर घडली आहे. या प्रकरणी आरोपी दुचाकीचालकास अटक करण्यात आली आहे. आरोपीला घटनास्थळावरूनच ताब्यात घेण्यात आले.
    ह्रदयद्रावक! म्हशींना पाणी पाजण्यासाठी नदीवर गेले; अन् अनर्थ घडला, लेकरांच्या आक्रोशानं गाव हळहळलं
    मिळालेल्या माहितीनुसार, प्रियंका बोरकर (२६) रा. शेगाव, अमरावती असे मृतक महिला पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. प्रियंका बोरकर या २०१७ मध्ये अमरावती ग्रामीण पोलिसांच्या आस्थापनेवर पोलीस अंमलदार म्हणून झाल्या होत्या. गेल्या एक वर्षांपासून त्या ग्रामीण मुख्यालयी नियंत्रण कक्षात कार्यरत होत्या. सर्व पोलीस ठाण्यातून नोंद गुन्ह्याची माहिती घेतल्यावर ड्युटी आटोपून त्या घरी निघाल्या होत्या. पहाटेच्या सुमारास पती सागर रमेश शिरसाट (३१) यांच्यासह दुचाकी क्रमांक एमएच २७ सीजे ४०७८ ने घरी जात होत्या. मार्गात संत गाडगेबाबा समाधी मंदिरासमोरील रस्त्यावर मागून आलेल्या भरधाव दुचाकी क्रमांक एमएच १२ आरडब्ल्यू ७५३० ने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात प्रियंका ह्या गंभीर जखमी झाल्या.

    ८ वर्षांनी तुरुंगातून परतले, रमेश कदमांची विधानसभेसाठी मतदारसंघात मोर्चेबांधणी सुरु

    पती सागर सिरसाट यांनी त्यांना तत्काळ जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान प्रियंका यांचा मृत्यू झाला. प्रियंका बोरकर या आठ महिन्यांच्या गरोदर होत्या. या घटनेने पोलीस दलात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, सागर शिरसाट यांच्या दुचाकीला मागून धडक दिल्यानंतर दुचाकीस्वार गौरव गोपाल मोहोड (३३) रा. रेखा कॉलनी हासुद्धा खाली कोसळला. तो मद्यधुंद अवस्थेत तेथेच पडून राहिला. अपघाताची माहिती मिळाल्यावर गाडगेनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत त्याला ताब्यात घेतले. त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed