• Sat. Sep 21st, 2024

एकतर फडणवीसांचा राजीनामा घ्या, अन्यथा त्यांची साथ सोडा; मराठा आंदोलकांची अजितदादांना विनंती

एकतर फडणवीसांचा राजीनामा घ्या, अन्यथा त्यांची साथ सोडा; मराठा आंदोलकांची अजितदादांना विनंती

बारामती: बारामती तालुक्यातील काटेवाडी येथे सकल मराठा समाजाच्या वतीने जालना येथील मराठा आंदोलकावरील हल्ल्याचा निषेध करण्यात आला. यावेळी आंदोलकांनी रास्ता रोको करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे फुल्या मारलेले फोटो झळकवत राज्य शासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

लाठीमार करण्यासाठी पोलिसांना मंत्रालयातून फोन गेला होता-तो फोन कुणाचा? संजय राऊत यांचा सवाल

यावेळी काटेवाडी सोसायटीचे चेअरमन स्वप्निल काटे म्हणाले, जालना येथील घटनेचा निषेध करण्यासाठी आम्ही सर्व मराठा समाजाच्या वतीने येथे जमलो होतो. या ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या फोटोवर फुल्या मारलेले निश्चित करण्यात आला. मात्र, यावेळी अजितदादांचा फोटो का नव्हता, अशी विचारणा करण्यात आली. जालना येथील घटनेला सर्वस्वी राज्याचे प्रमुख म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे फुल्या मारलेले फोटो झळकवत गृहमंत्र्यांचा निषेध केला.आम्ही समस्त काटेवाडी ग्रामस्थांच्या वतीने अजित दादांना एकच विनंती करतो की, दादांनी एकतर देवेंद्र फडणवीस यांचा राजीनामा घ्यावा किंवा त्यांची साथ तरी सोडा. आम्ही सकल मराठा समाज तुमच्याकडे खूप अपेक्षेने पाहत आहोत, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

Maratha Morcha: पोलीस गोळ्या घालत होते म्हणून मला आंदोलकांनी वेढलं होतं, फडणवीस खोटं बोलतायत: मनोज जरांगे

यावेळी बोलताना अमोल काटे म्हणाले, ज्यांना येथील घटनेला सर्वस्वी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व गृहमंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे जबाबदार आहेत. या ठिकाणी आंदोलनावर अमानुषपणे लाटी हल्ला करून जबर मारहाण करण्यात आली. लहान मुले, महिला यांना देखील सोडले नाही‌. आमचा पोलिसांवर रोष नाही. वरिष्ठांच्या आदेशाने हे कृत्य केले. मात्र त्यांना आदेश देणाऱ्या वरिष्ठांविषयी आमचा राग आहे. मागील सात वर्षांमध्ये मराठा समाजाने लाखोच्या संख्येने मोर्चे काढले मात्र कुठेही अनुचित प्रकार घडला नाही. शांततेच्या मार्गाने सुरू असणारे हे आंदोलन दडपण्याचा सरकारने प्रयत्न का केला? कारण जालना येथे काही दिवसात शासन आपल्या दारी हा राज्य शासनाचा उपक्रम होणार आहे. या कार्यक्रमाला अडचण नको म्हणून पोलिसी बळाचा वापर करत आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला. येथील अनेक आंदोलकांवर तसेच युवक महिलांवर गुन्हे देखील दाखल करण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे. हा सर्व प्रकार चीड आणणारा असून मराठा समाजाच्या भावना दुखवणार आहे त्यामुळे आम्ही हे आंदोलन करत आहोत, असे काटे यांनी सांगितले.

मराठा आंदोलकांवर लाठीचार्ज, महाविकास आघाडीनं टरबूज फेकून व्यक्त केला निषेध

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed