Dahanu Health System Failure: डहाणू रुग्णालयात गर्भवतींची गैरसोय होत आहे. 108 रुग्णवाहिकेसाठी तासन् तास प्रतीक्षा करावी लागते.
आदिवासी व ग्रामीण भागात गरोदर मातांची नोंदणी झाल्यानंतर या महिला नऊ महिन्यांपर्यंत सरकारी रुग्णालयात उपचार घेतात. मात्र ऐन बाळंतपणावेळी डॉक्टर उपलब्ध नसल्याचे सांगून त्यांना अन्यत्र जाण्याचा सल्ला दिला जातो. जोखमीच्या तसेच अतिजोखमीच्या प्रसूतीच्या कळा आणि उपचारात हेळसांड हे दुखणे पालघर जिल्ह्यातील आदिवासी आणि ग्रामीण महिला अनेकवर्ष सोसत आहेत. परंतु प्रशासन दखल घेत नसल्याने डहाणू उपजिल्हा रुग्णालयात प्रसूतीसाठी आलेल्या दर्शना माच्छी यांना असाच अनुभव आला.
LPG Price Hike: कुटुंबाचे बजेट ‘गॅस’वर; ऐन उन्हाळ्यात सिलिंडरच्या दरवाढीचा ताप, हॉटेल व्यावसायिकही चिंतेत
डहाणू शहरातील वडकून येथे राहणारी दर्शना हिला शनिवारी रात्री प्रसूतीकळा सुरू झाल्या. कुटुंबीयांनी तिला डहाणू उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले, मात्र तिची सिझेरियन प्रसूती असल्याचे सांगून जोखमीच्या प्रसूतीसाठी गुजरातमध्ये नेण्याचा सल्ला रुग्णालय प्रशासनाने दिला. नऊ महिने सरकारी दवाखान्यात उपचार घेतल्यानंतर असा आदेश का दिला जातो याबाबत कुटुंबीयांनी विचारणा केली. या प्रसूतीसाठी तज्ज्ञ डॉक्टर उपलब्ध नसल्याचे त्यांना सांगण्यात आल्यावर रुग्णवाहिकेसाठी १०८ नंबरवर कॉल करून नोंदणी केली. मात्र किमान दीड-दोन तासानंतर सेवा मिळेल असे कुटुंबीयांना सांगण्यात आले.
लाडकी बहिण योजनेचं नाव सांगून कागदपत्रं मागितली, शिंदेंनी वाघमारेंच्या उमेदवारीचा किस्सा सांगितला
डहाणू शहरातील दोन खासगी रुग्णालयात कुटुंबीयांनी संपर्क साधला, परंतु तेथेही डॉक्टर उपलब्ध नव्हता. अन्य एका रुग्णालयातून सकारात्मक प्रतिसाद मिळाला. तेथे दाखल करेपर्यंत पहाटेचे तीन वाजले.
