पुण्यातील कोंढवा परिसरात दुचाकीला कट मारल्याच्या क्षुल्लक वादातून तरुणावर जीवघेणा हल्ला. एका महिलेसह दोन अल्पवयीन मुलांविरुद्ध गुन्हा दाखल. भाग्योदयनगर भागातील धक्कादायक घटना.
नेमकं काय घडलं?
“गाडीला कट का मारला?” म्हणून तरुणावर जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना कोंढव्यातील भाग्योदयनगरमध्ये शनिवारी रात्री १० वाजताच्या सुमारास घडली. तरुण मक्का ओम सोसायटीजवळ दुचाकीवरून जात होता. अचानक त्या तरुणाचा आणि दुसऱ्या गटाचा वाद सुरु झाला. कारण काय? तर त्याच्या गाडीला कट मारला होता. वाद सुरुवातीला साधा वाटला, पण अचानक संतापलेल्या दोन अल्पवयीन मुलांनी आणि एका महिलेनं तरुणाला थांबवलं.
त्यानंतर वादाचे रूपांतर हळूहळू हाणामारीत झालं. हाणामारी थरारक रूपात बदलली आणि आरोपींनी तरुणाच्या थेट डोक्यावर वार करण्याचा प्रयत्न केला. लोकांचं लक्ष वेधून घेणारं म्हणजे हा वाद साधा कटचा होता, पण आता जीवघेणा हल्ल्यात रूपांतरित झाला.
Jalgaon Crime : आजाराने मृत्यू, कागदावर मात्र अपघात; 50 लाखांच्या विम्यासाठी डॉक्टर-पोलीसांनीच रचला कट, 10 जणांवर गुन्हा
तरुण गंभीर जखमी
या धक्कादायक घटनेनंतर तरुण गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. आरोपी सध्या फरार असून पोलिसांनी महिलेसह मुलांविरुद्ध खुनाचा प्रयत्न म्हणून गुन्हा नोंदवला आहे. पोलिस उपनिरीक्षक खोपडे हे या प्रकरणाचा तपास करीत आहेत. आरोपी महिलेचा आणि मुलांचा शोध घेण्यासाठी कोंढवा पोलिसांची पथके रवाना झाली आहेत.
Mumbai Airport: 400 मीटरसाठी 18000 रुपये! मुंबई विमानतळावर टॅक्सी-रिक्षाचालकांची दादागिरी; पोलिसांच्या कारवाईत 80 गुन्हे दाखल
मात्र या घटनेनंतर कोंढावा परिसरात खळबळ उडाली आहे. अल्पशा कारणावरून केलेला वाद टोकाला गेल्यामुळे तो एखाद्याच्या जीवावर बेतू शकतो हे पाहून नागरिकांच्या मनामध्ये आता भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे नागरिकांनी सावध राहणे, रस्त्यावर कोणताही तणाव न वाढवणे, आणि हिंसक परिस्थिती उद्भवल्यास लगेच पोलीस संपर्कात राहणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
