मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी यावेळी आंदोलनकर्ते जरांगेंशी फोनवरुन संवाद साधला. शुक्रवारी घडलेल्या घटनेची त्यांनी जरांगे यांच्याकडून माहिती घेतसी. यावेळी एक एक करून जरागेंनी राज यांना घटनेची माहिती दिली. यावेळी घटनेची माहिती घेतल्यानंतर राज यांनी जखमींचीही विचारपूस केली. मनसेचे नेते बाळ नांदगावकर हे त्यावेळी प्रत्यक्ष उपस्थित होते. त्यांनी सुद्धा या आंदोलकांची विचारपूस केली. तसेच, मनसेचा उपषोणकर्त्यांना पाठिंबा असल्याचं त्यांनी यावेळी म्हटलं आहे.
आंदोलनकर्त्यांना न्याय मिळवून देऊ, मनसे तुमच्या पाठीशी
आम्हालाच मारुन आमच्यावर गुन्हे दाखल करण्यात आलेत. लहान लहान मुलांना मारण्यात आलंय. माय माऊल्यांनाही काठीने मारलं. कुणावर गोळ्या चालवल्या गेल्या. आम्ही शांततेत आमरण उपोषण करत होतो. यावर आम्हाला काय बोलावं हेच कळत नाही. पण हा असा अन्याय आम्ही निजामाच्या काळात देखील पाहिला नव्हता आणि इंग्रजांच्या काळात देखील पाहिला नव्हता, अशी व्यथा जरांगे यांनी राज ठाकरे यांच्यासमोर मांडली. यावेळी आंदोलनकर्त्यांना न्याय मिळवून देऊ, मनसे तुमच्या पाठीशी आहे, असं आश्वासन राज ठाकरे यांनी दिलं.
पूर्व-इतिहास बघता आंदोलकांनी कोणतंच चुकीचं पाऊल टाकलं नसणार
ही घटना अतिशय दुर्दैवी आहे असल्याचं सांगत मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी घटनेचा निषेध नोंदवला. जालन्यात काल असं काय घडणार होतं की प्रशासनाने असं टोकाचं पाऊल उचललं? पोलिसांच्या अहवालात माहिती येईलच, पण मी खात्रीने सांगतो की, पूर्व-इतिहास बघता आंदोलकांनी कोणतंच चुकीचं पाऊल टाकलं नसणार. त्यामुळे इथे सरकारचं चुकलं हे निश्चित, असं मत व्यक्त करताना राज ठाकरे यांनी महायुती सरकारवर टीका केली.