• Mon. Jun 15th, 2026

    Pune Ring Road: मुंबईहून पश्चिम महाराष्ट्राचा प्रवास होणार सोपा, पुणे बाह्य रिंग रोडला गती; पहिला टप्पा 65 किमी लांब

    Pune Ring Road: मुंबईहून पश्चिम महाराष्ट्राचा प्रवास होणार सोपा, पुणे बाह्य रिंग रोडला गती; पहिला टप्पा 65 किमी लांब

    Pune Outer Ring Road: पुणे बाह्य रिंग रोडच्या कामाला सुरुवात होऊन एक वर्ष झालं आहे. पहिल्या टप्प्यातील 99 टक्के जमीन MSRDC ने संपादित केली आहे.

    पुणे: पुण्यातील बहुप्रतिक्षित बाह्य रिंग रोडच्या पश्चिम कॉरिडोरवर कामाला गती मिळाली आहे. या 168. 605 किमी लांब मार्गाच्या कामाला सुरूवात होऊन सध्या एक वर्ष झालं आहे. या प्रकल्पासाठी 55,622 कोटी रुपये खर्च होणार आहे. पुणे बाह्य रिंग रोडचा मार्ग 110 मीटर रुंद असून यामुळे मुंबई ते बंगळुरू प्रवासाचा वेळ कमी होणार आहे.

    कसे असतील मार्ग?

    पुणे बाह्य रिंग रोड या मार्गावर एकूण आठ दुहेरी बोगदे, सात मार्ग, 10हून अधिक पूल, 26 भुयारी मार्ग, 21 ओव्हरपास आणि 9 पादचारी भुयारी मार्ग तयार करण्यात येणार आहेत. या मार्गाचं काम सुरू झाल्याच्या एका वर्षानंतर पश्चिम कॉरिडोरवरील काम सुरू झालं आहे. यामुळे मुंबई, बंगळुरू आणि पश्चिम महाराष्ट्रातील प्रवासाचा वेळ वाचणार आहे. याशिवाय संपूर्ण मार्गावर अनेक अंडरपास आणि ओव्हरपाससुद्धा बांधण्यात येणार आहेत. यामुळे वाहतूककोंडी टाळणं शक्य होणार आहे. दरम्यान, संपूर्ण मार्गावर रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी कुंपण घातले जाणार आहे. यामुळे मार्गावरील प्रवास सुरक्षित होणार आहे.Maharashtra TimesPune News : पुणेकरांना वाहतूक कोंडीवर मोठा दिलासा, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासमोरील दुमजली उड्डाणपूल सुरु

    महराष्ट्रातील अनेक भागांत जाताना वाहनांना पुणे शहरातून प्रवास करावा लागतो. शहरात यामुळे सतत वाहतूक कोंडी वाढते तसेच बाहेर प्रवास करणाऱ्यांच्या वेळही वाढतो. या बाह्य रिंग रोडमुळे शहरात न जाताच थेट पुण्याहून इच्छुक स्थळी पोहचता येणार आहे. दरम्यान, शहरातील वाहनांना मोकळा श्वास घेता येणार असून वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात कमी होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (MSRDC) कडून या प्रकल्पावर काम सुरू आहे.

    पश्चिम व पूर्व कॉरिडोर

    पुणे बाह्य रिंग रोडच्या प्रकल्पात सध्या दोन टप्पे आहेत. पहिल्या टप्प्यात 65.45 किमी लांब पश्चिम कॉरिडोरचा समावेश असून दुसऱ्या टप्प्यात 103.155 किमी लांबीच्या पूर्व कॉरिडोरचा समावेश आहे. पहिल्या टप्प्यातील काम 5 पॅकेजेसमध्ये करण्यात येणार असून पुढील टप्प्यातील काम 7 पॅकेडेसमदध्ये होणार आहे.

    Maharashtra TimesMumbai-Pune Expressway: मुंबई-पुणेदरम्यान तिसरा द्रुतगती मार्ग, लोणावळा-खोपोली नवा रस्ता; बोगदे, उड्डाणपुलांचा समावेश

    पश्चिम कॉरिडोर मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर उर्सेवरून ते थेट पुणे-बंगळुरू महामार्गावर शिवारेपर्यंत जोडला जाणार आहे. मुंबईहून सातारा, सांगली, कोल्हापूर आणि बंगळुरूकडे जाणाऱ्या प्रवाशांना मोठा फायदा होणार आहे. पश्चिम कॉरिडोरच्या भुसंपादनाचं काम पूर्ण होणार असून बांधकामाला वेग आला आहे.

    सध्या उर्से ते शिवारे पुणे बायपासवरून जावं लागतं. हा मार्ग 58 किमी लांब असला तरीही शहरातील वाहतूक कोंडीमुळे प्रवासाला 1 तास 20 मिनिटे लागतात. रिंग रोड तयार होताच हे अंतर 30 मिनिटांत पार होण्याची शक्यता आहे. सध्या 38 गावांमधून 99 टक्के जमीन MSRDCने संपादित केली आहे.

    सानिया कदम

    लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम, मटा ऑनलाईनमध्ये कन्सल्टंट पदावर कार्यरत आहे. प्रामुख्याने क्राइम, सिव्हिक आणि पॉलिटिक्स या बातम्या कव्हर करते. याआधी सहा महिने महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमध्ये कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून काम केले आहे. त्या काळात कॉलेज इव्हेंट्स, शैक्षणिक उपक्रम आणि सोशल मीडियावरील ट्रेंड्सवर बातम्या केल्या. मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून BMM मध्ये पदवी घेतल्यानंतर सध्या के.सी. महाविद्यालयात MA in Communication and Journalism करत आहे. इंटरनॅशनल घडामोडी आणि पॉप कल्चर हे विषय विशेष आवडीचे असून इंग्लिश आणि मराठी या दोन्ही भाषेत वाचन व लेखन करण्याची आवड आहे.… आणखी वाचा