• Sat. Sep 21st, 2024

आजपासून शिक्षकांची ‘परीक्षा’; मराठवाड्यातील २६,४३० जण देणार प्रेरणा परीक्षा

आजपासून शिक्षकांची ‘परीक्षा’; मराठवाड्यातील २६,४३० जण देणार प्रेरणा परीक्षा

म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर : शिक्षकांसाठीची शिक्षक प्रेरणा परीक्षा आज, रविवारी (३० जुलै) व उद्या, सोमवारी (३१ जुलै) होत आहे. मराठवाड्यातील आठ जिल्ह्यातील २६ हजार ४३० शिक्षक परीक्षा देणार आहेत. विभागातील केवळ ३५.८८ शिक्षकांनी परीक्षेला होकार दिला आहे. एकूण ९३ परीक्षा केंद्रांवरून परीक्षा घेतली जाणार आहे.

मराठवाड्यातील आठ जिल्ह्यातून परीक्षेला प्रतिसाद कमी आहे. परीक्षा ऐच्छिक असल्यामुळे परीक्षेला किती प्रतिसाद मिळेल याबाबत विभागातील अधिकाऱ्यांमध्ये सुरुवातीपासून साशंकता होती. परीक्षेच्या काही तास आधीपर्यंत परीक्षार्थ्यांची निश्चित संख्या, परीक्षा केंद्र याबाबतची धांदल सुरू होती. दोन दिवसांत विविध विषयांची परीक्षा होणार आहे. मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांतून २६ हजार ४३० शिक्षकांनी परीक्षेसाठी नोंदणी केली आहे. परीक्षेसाठी काही तालुक्यांनी नियोजन उत्तम केल्याचेही समोर आले. परीक्षेबाबतचे पत्र, परीक्षार्थी शिक्षकांची यादी जाहीर केली. ज्यामध्ये परीक्षा केंद्र, बैठक क्रमांक, परीक्षार्थी शिक्षकाचे नाव याचा समावेश आहे. सकाळी ९.३० वाजता परीक्षा केंद्रावर शिक्षकांना उपस्थित राहायचे आहे. परीक्षेपासून संबंधित शिक्षक वंचित राहणार नाही याची जबाबदारी संबंधित मुख्याध्यापकांची राहणार आहे. शिक्षण विस्तार अधिकारी परीक्षेचे नियोजन करीत असल्याचे सांगण्यात आले.

‘पीसीएम’ची आज परीक्षा

शिक्षक प्रेरणा परीक्षेत भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र विषयाची आज, रविवारी परीक्षा होणार आहे. भौतिकशास्त्र विषयाचा पेपर सकाळी १० ते ११ वाजता, रसायनशास्त्र ११.३० ते १२.३० व जीवशास्त्रचा पेपर दुपारी १ ते २ या वेळेत होणार आहे. गणित, इंग्रजी, इतिहास व भूगोल विषयाचे पेपर सोमवारी होणार आहेत. प्रत्येक पेपर ५० गुणांचा असून पेपर सोडविण्यासाठी एक तासाचा कालावधी देण्यात आला आहे.

कराड येथील वराडे गावात एकाच वेळी तीन बिबटे शिरले, दोन हजार लोकवस्ती असलेलं गाव भयभीत!

जिल्हानिहाय आकडेवारी..
जिल्हा परीक्षार्थी शिक्षक परीक्षा केंद्र

छत्रपती संभाजीनगर ३,२२७ ११
जालना १,४७५ ५
परभणी ६७६ १
हिंगोली ४,२०१ १६
नांदेड ४,४९२ १७
बीड ७,४७१ २६
लातूर ४४४ २
धाराशीव ४,४४४ १५

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed