आभा हेल्थ कार्डचे फायदे
– उपचारांसाठी प्रत्यक्ष अहवाल, कागदपत्रे घेऊन जाण्याची गरज नाही.
– आभा कार्डमध्ये ब्लड ग्रुप, आजार, याची संपूर्ण माहिती असेल.
– मिशन अंतर्गत प्रत्येक व्यक्तीसाठी युनिक हेल्थ कार्ड बनविले जाणार आहे.
– ऑनलाइन उपचार, टेलिमेडिसीन, ई-फार्मसी, पर्सनल हेल्थ रेकॉर्ड या सुविधा मिळतील.
– वैद्यकीय अहवाल मेडिकल इन्शुरन्स कंपनीला शेअर करता येईल.
आवश्यक कागदपत्रे
– आधार कार्ड
– आधार लिंक मोबाइल क्रमांक
आभा आरोग्य कार्ड कसे काढावे ?
– नॅशनल डिजिटल हेल्थ मिशनच्या संकेतस्थळ healthid.ndhm.gov.in वर जावे.
– होम पेजवर क्रिएट आभा नंबर असे बटन असेल, त्यावर क्लिक करावे.
– पुढच्या पेजवर आयुष्मान भारत हेल्थ अकाउंट (आभा) तयार करण्यासाठी दोन पर्याय दिसतील.
– आधार कार्ड आणि वाहतूक परवान्याचा वापर करून हेल्थ कार्ड तयार करता येते.
– आधार कार्डला मोबाइल नंबर लिंक नसेल तर वाहतूक परवान्याचा पर्याय निवडावा.
२ कोटी ४४ लाख कार्डची नोंदणी
राज्यात आतापर्यंत २ कोटी ४४ लाख नागरिकांनी आभा हेल्थ कार्डची नोंदणी केली आहे. जास्तीत जास्त नागरिकांनी नोंदणी करावी यासाठी आरोग्य विभागाच्या वतीने जनजागृती करण्यात येत असल्याचे आरोग्य सेवा विभागााने सांगितले.